mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 28, 2026
in राज्य
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र आहे.

कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. दुर्गाप्रसाद पांडे असं आरोपीचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे. कल्याणमध्येही हे चित्र आहे.

गुटखा मिळत नाही म्हणून शिवीगाळ

गुटखा मिळत नाही या रागातून दुर्गाप्रसाद पांडे या ओला कॅब चालकाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये या पांडेने तुकाराम मुंढे यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं दिसून आलं.

मात्र ही शिवीगाळ या पांडेला चांगलीच महागात पडल्याचं दिसून आलं. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत या विकृताचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुटख्याची टंचाई निर्माण झाल्याने आणि एफडीएच्या कडक कारवाईमुळे गुटखा मिळत नसल्याने आरोपी दुर्गाप्रसाद पांडे प्रचंड नाराज होता. त्यातच त्याच्या वडिलांची टपरी देखील बंद झाली होती.

या सर्व गोष्टींचा राग मनात धरून त्याने थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

कॅब चालकाला बेड्या

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अमर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 4 तासांच्या आत आरोपीला अटक केले.

अटक करण्यात आलेला दुर्गाप्रसाद पांडे हा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहणारा असून तो व्यवसायाने ओला कॅब चालक आहे. सध्या खडकपाडा पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तुकाराम मुंढे

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 13, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
Next Post
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; 'या' कारवाईने खळबळ

ताज्या बातम्या

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 14, 2026
प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

August 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा