टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथील एका तरुणाने चिट्टी लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अनिल शंकर लंगोटे (वय 21) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादीचा चुलत भाऊ मयत अनिल लंगोटे याने त्याचे आई वडील बाहेर कामाला गेलेले असताना रात्री 9 च्या सुमारास
त्याचे राहत्या घरी पत्र्याच्या खोलीतील सिलींग फैनला सुताचे दोरीचे सहाय्याने कोल्यातरी अज्ञात कारणावरून गळफास घेवुन तो मयत झाला असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.
खिशात कागदाची चिट्टी सापडली
दरम्यान, पोलीस पंचनामा करतेवेळी त्याचे खिशात एक पांढरी कागदाची चिट्टी सापडली त्यात माझे मृत्युस कोणीही जबाबदार नाही असे लिहून त्या खाली सही केलेली असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हंटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज