टीम मंगळवेढा टाईम्स न्युज | सांगोला
कुत्र्याने कोंबडी पळवून नेल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये तरुणाच्या हातावर काठीने मारहाण केली. एकाच्या पाठीवर दगड मारून जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अभिजित घाडगे (रा. विठ्ठलवाडी, महुद बु., ता. सांगोला) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घाडगे यांच्या घराजवळील दशरथ जाधव यांची कोंबडी फिर्यादीच्या कुत्र्याने पळवून नेली.

कोंबडीच्या मागे सुशांत व शुभम जाधव हे धावत असताना अभिजित घाडगे यांनी कुत्र्याच्या मागे पळू नका, कोंबडीचे जे काही नुकसान झाले असेल त्याचे पैसे देतो, असे सांगितले.

याचा राग आल्याने शुभम जाधव, सुशांत जाधव, सोमनाथ जाधव व दिलीप जाधव यांनी शिवीगाळ व दमदाटी केली.

भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अभिजित यांच्या प्रतीक व अजय या भावांनाही शिवीगाळ व मारहाण केली. शुभम याने काठीने अभिजित यांना मारहाण केली. तर दिलीप जाधव याने प्रतीक घाडगे यांच्या पाठीत मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गौरव बाबर व शेरसिंग मणेरी यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. त्यानंतर धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जखमी अभिजित व प्रतीक यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













