टीम मंगळवेढा टाईम्स।
अनंतकोटी ब्रह्मांडनायक, निष्काम कर्मयोगी श्री संत सदगुरु बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन आज गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता श्री क्षेत्र मरोळी मठ येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले आहे.

श्री संत बागडे महाराज संस्थान, मारोळी मठाधिपती श्री. ह. भ. प. संदेश भोसले महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा पुण्यतिथी सोहळा पार पडणार आहे.

कार्यक्रमादरम्यान सदगुरु बागडे बाबांच्या मूर्तीवर भाविकांच्या उपस्थितीत भव्य पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी या पुण्यतिथी सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीगुरु ह.भ.प संदेशजी महाराज यांनी सागितले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









