टीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला (सुरेश झिंजूरटे)
माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा सांगोला नगरीचे उपनगराध्यक्ष नितीन उर्फ आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

वाढेगाव रोड येथील माणगंगा ॲग्रो मार्ट येथे भव्य मोफत सर्वधर्मीय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचा परिसरातील हजारो गरजू रुग्णांनी लाभ घेतला.

शिबिरामध्ये हृदयरोग, कर्करोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग आणि बालरोग यांसारख्या विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. नेत्र तपासणी झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक मोहन मस्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डिजिटल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश सावंत, डॉ. शिवराज भोसले, डॉ. विजय बंडगर, डॉ. महादेव आलदर, डॉ. भारत गरांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष माणिकराव भोसले, ‘आपुलकी’चे अध्यक्ष राजेंद्र यादव, माणगंगा परिवाराचे व्हाईस चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक सचिन इंगोले, अश्विनकुमार इंगोले, डॉ. दत्तात्रय इंगोले आणि आण्णासो केदार उपस्थित होते. सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी व सीए किसन माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन पार पडले.

सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.

”अनेकांना रोजगार देणारे, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणारे आणि दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचे सुख शोधणारे आबासाहेब इंगोले हे कृतिशील व्यक्तिमत्त्व आहेत,” अशा शब्दांत मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, माजी नगरसेवक गजानन बनकर, डॉ. निरंजन केदार आणि संचालक विजय वाघमोडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास शिवसेना नेते सागरदादा पाटील, दिग्विजयदादा पाटील, नगराध्यक्ष आनंदा माने, गटनेते प्रशांत धनवजीर, नगरसेवक अरुण पाटील, सोमेश यावलकर, काशिलिंग गावडे, जि. प. सदस्य दादासाहेब लवटे, अतुल पवार, युवासेना अध्यक्ष गुंडादादा खटकाळे, उद्योगपती प्रमोददादा साळुंखे-पाटील, विष्णुपंत केदार, विठ्ठल परिवाराचे संस्थापक दीपकराव बंदरे, पत्रकार संघटना अध्यक्ष रविराज शेटे सर, माणगंगा संस्थेच्या चेअरमन अर्चनाताई इंगोले यांच्यासह सांगोल्यातील नामांकित डॉक्टर्स, माणगंगा परिवाराचे संचालक, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विवेक घाडगे यांनी केले, तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे यांनी मानले.
जनसेवेचा वसा माणगंगा परिवाराच्या माध्यमातून सुरू राहील
”वाढदिवस हे केवळ निमित्त असून शेतकरी बांधवांना सक्षम करणे आणि समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर्स व लॅब तंत्रज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले. जनसेवेचा हा वसा माणगंगा परिवाराच्या माध्यमातून अविरत सुरू राहील.”— नितीन उर्फ आबासाहेब इंगोले (संस्थापक, माणगंगा परिवार)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज
















