mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऐतिहासिक मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 2, 2026
in राज्य
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

रात्रीच्या किर्र अंधारात, साप-विंचवाचा जीवघेणा धोका पत्करत पिकांना पाणी देण्याचा शेतकऱ्यांचा त्रास कधी संपणार? हाच प्रश्न गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी विचारत आहे.

याच गंभीर समस्येवर आता थेट राज्य सरकारने मोठा तोडगा काढला असून शेतकऱ्यांची ही सर्वात मोठी डोकेदुखी आता कायमची मिटणार आहे.

महाराष्ट्र कृषी दिनाचे निमित्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे.

मुंबईत आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आता हक्काची दिवसा वीज मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात असून, हे वर्ष संपेपर्यंत राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल. यामुळे यंदाचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन आला आहे.

या योजनेच्या स्वरूपाविषयी माहिती देताना फडणवीस म्हणाले की, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा पुरवठा वाढवून शेतीसाठी सलग १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाईल.

त्यामुळेच शेतकऱ्यांचा रात्रीचा ताण संपणार आहे. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरणासाठी सध्या संपूर्ण देशात सर्वाधिक बजेट हे महाराष्ट्र सरकारचेच आहे, याकडेही त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.

दुसरीकडे, बाजारात येणाऱ्या बोगस बियाणांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आणि त्यांची फसवणूक होते.

यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आता सर्व प्रकारची बियाणे सरकारच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून सर्टिफाइड करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे बनावट बियाणांच्या काळ्या बाजाराला पूर्णपणे आळा बसेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल.

शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर सरकारचा मोठा भर आहे. फडणवीस यांनी सांगितले की, शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी देशातील पहिले कृषी आधारित एआय (AI) ॲप आपल्या कृषी विभागाने विकसित केले आहे. गेल्या तीन वर्षांत राज्याने फलोत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.

आगामी काळात पशुपालन क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील. विदर्भ आणि मराठवाड्यातील बदलत्या हवामानानुसार शेती कशी करायची, यावरही सरकार वेगाने धोरण आखत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
Next Post
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

ताज्या बातम्या

माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 14, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा