mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 2, 2026
in आरोग्य, राज्य
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी हाती घेताच अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएने राज्यभरात दूध, तूप, पनीर, दही यांसारख्या अन्नपदार्थांमधील भेसळीसह औषध दुकानांवरही धडक छापेमारीचे सत्र सुरू केले आहे.

मुंढे यांच्या या धडक कारवाईच्या धसक्यामुळे राज्यातील बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून, गुटखामाफियांनी आपले बस्तान हलविले आहे. दुसरीकडे कारवाईच्या भीतीने दूध, तूप आणि मिठाई विक्रेत्यांनी मालाची आवकच थांबवली असून, दाणा बाजारातून सुटे तेल पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर दूध, पनीर, तूप आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीवर छापेमारी झाली. त्यात बनावट दूध, युरियायुक्त, पामतेलापासून तयार झालेल्या दुधाचे गंभीर प्रकार जळगाव शहरालगत आढळून आले.

गुटखा गायब

महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा पारित होऊन जवळपास १५ वर्षे उलटली. बंदी असताना ब्लॅकने आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात गुटख्याची विक्री-तस्करी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात मध्यवर्ती जिल्‍हा असलेल्या जळगाव जिल्ह्यात गुजरात, मध्य प्रदेश, आंध्रासह इतर राज्यातून तस्करीच्या मार्गाने गुटखा आणून विक्री व साठवणूक सुरू होती.

गावखेड्यापासून ते शहरात पान टपऱ्यांवर अक्षरशः तोरण लटकवून विक्री होणारा गुटखा आता गायब झाला आहे. मोठ्या पान दुकानदारांनी गुटखा ठेवणेच बंद केले असून, गल्लीतील किरणा दुकानदार, ठेल्यांवर गुटखा लपूनछपून ब्लॅकमध्ये विक्री होत असल्याचे चित्र जळगावात आहे.

गुटखा गुदाम स्थलांतरित

तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने अन्न व औषध प्रशासनानेही कारवाईला गती आणली असून मिळेल तेथे छापेमारी केली जात आहे. अशातच तस्करीच्या मार्गाने येणाऱ्या गुटख्याची आवक पूर्णपणे बंद झाली नसली तरी भीतीपोटी गुटखामाफियांनी आपले गोदाम स्थलांतरित केले आहेत. शहरातील नामवंत विक्रेत्यांनी दुकानावर विक्री बंद करुन गुटख्यासाठी खास वेगळ्या ठिकाणी विक्री व्यवस्था केली आहे.

व्यसनी वळाले तंबाखूकडे

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे जळगावात गुटखा मिळेनासा झाला असून, काळ्या बाजारात केवळ ओळखीच्या ग्राहकांनाच तो मिळत आहे. परिणामी, व्यसनी लोकांनी तंबाखू-चुन्याकडे मोर्चा वळवला आहे. पानटपरीचालक आता तंबाखूच्या पुडीत कथ्था, चुना व सुपारी टाकून ओला ‘बार’ बनवून विकत असल्याने तंबाखूच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

डेअरी उद्योग ‘एफडीए’च्या रडारवर

जळगाव नजीकच्या धरणगाव, पाळधी व बांभोरी परिसरामध्ये दुधाचा फॅट वाढविण्यासाठी पामतेलाची भेसळ होत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील १५ पैकी ८ तालुक्यांतून भेसळयुक्त दुधाच्या तक्रारी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यात बनावट पनीर व बटरची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने संपूर्ण डेअरी उद्योग ‘एफडीए’च्या रडारवर आला आहे. गेल्या १५ दिवसांत जळगाव शहरासह तालुक्यातील मुख्य डेअरींमधून दूध, दही, पनीर व तुपाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.

तेल विक्रेते धास्तावले

गेल्या महिन्यापूर्वीच गोडे तेलावर (शेंगदाणा) एक लिटर मागे २२ रुपयांची वाढ झाली होती. तर, राईसब्रेन, सूर्यफूल, सोयाबील तेलांचे दरही त्या तुलनेत वाढविण्यात आले होते. मोठ्या ब्रॅण्डस्‌कडून १ किलो तेल सांगून केवळ ९५० किंवा ९०० ‘एमएल’ तेल ग्राहकांना दिले जात होते. आता मात्र पूर्ण १ हजार ग्रॅम किंवा लिटरमध्ये १ लिटर, ५ लिटर, १५ लिटर दिले जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; 'प्रथम फाउंडेशन' व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा