मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक काल बुधवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले.
यामुळे शेतजमीन नसलेल्या पण शेती संलग्न उद्योगात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांना ‘महिला शेतकरी’ दर्जा मिळेल. त्यांना बँक कर्ज, विविध सरकारी अनुदानाचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

शेतजमीन नसलेल्या महिलांनाही शेतकरी म्हणून दर्जा दिला जाणार आहे. या कायद्यानुसार महिला शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे, त्यांना कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे, महिला शेतकरी प्रमाणपत्र देणे,

त्यांची माहिती संकलित करणे, निधी उभारणे, सक्षमीकरण कक्ष स्थापन करणे, सक्षमीकरण परिषद व राज्य सनियंत्रण समिती स्थापन केली जाईल. समस्यांच्या निराकरणासाठी केंद्रे व तक्रार निवारण यंत्रणा असेल.

कोणाला मिळेल दर्जा?
शेती पिकांची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधमाशी पालन, मासेमारी, जलीय संवर्धन, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी-वनीकरण, चराई, कंपोस्ट खत निर्मिती,

कुळवहिवाटीने लागवड, बटाई, स्थलांतरित शेती, गौण वनोत्पादनाचे संकलन, वापर व विक्री इत्यादी सर्व शेतीविषयक कार्यात सहभागी महिलांना शेतकरी दर्जा दिला जाणार आहे.

कुठे करावा अर्ज ?
महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येण्याची तरतूद या विधेयकात आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित महिलांना ग्रामपंचायतीकडे तर निमशहरी भागात नगरपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













