mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! AC पासून ते WFH पर्यंत…,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन, VIDEO तून महत्त्वाचा संदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 19, 2026
in राज्य
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात आता पडसाद उमटत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेला आवाहन केलं आहे.

“आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केलं आहे. यासाठी देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या’ असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या X या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल कमी वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसंच सोनं खरेदी करू नका असंही आवाहन केलं आहे. सोनं आपल्याकडे आयात केलं जातं त्यामुळे सोनं खरेदी केल्यामुळे आपल्या देशातील पैसा हा परदेशी चलनात जातो.

तीच परिस्थिती ही इंधनाची आहे, इंधन आपण आयात करतो, त्यामुळे तिथे परकीय चलनात आपला पैसा जातो. त्यामुळे आखाती देशामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. कुणाला राजकारण करायचं असेल तर करू द्या, त्यांनी उत्तर देण्यासाठी आपण समर्थ आहोत. पण, अशावेळी देशासाठी एकसंध उभे राहणे गरजेचं आहे” असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केलं.

पहा व्हिडीओ-

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय केलं आवाहन

“छोट्या छोट्या बदलातून देशाला मदत आणि देशसेवा करू शकतो. नवीन वाहन खरेदी करत असताना शक्यतो ईलेक्ट्रिक वाहनं खरेदी करा.

– अनेक शहरांमध्ये आपण ई बसेस दिल्या आहे, मेट्रो सुरू केल्या आहे, त्यामुळे शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.

– जर तुमच्याकडे कारचा वापर करायचा असेल तर समुहाने प्रवास करा, म्हणजे, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी चार मित्रांनी मिळून प्रवास करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेईकल डे पाळण्याचा प्रयत्न केला.

-कोविड काळामध्ये आपण पारांगत झालो आहोत, त्यामुळे वर्क फ्रॉर्म होम केलं होतं, ते सुद्धा करून पाहा.

– घरात असेल किंवा इतर कुठेही असेल AC हा 24 डिग्रीच्या खाली वापरू नका.

– परदेशातील प्रवेश टाळा, परदेशातील आपल्या मित्रांना सांगून त्यांनाच भारतात फिरण्यासाठी या, असं सांगून पर्यटनाला चालना देऊ शकतात. अशी साधी सोपी कामं आपण करू शकतो.

“राष्ट्र प्रथम या भावनेतून एकजूट होऊ या”

गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ज्या उंचीवर नेलं आहे, ते आपण अनुभवतोय, त्यामुळे यावेळी आपण पंतप्रधानांच्या आवाहनाला साथ द्याल कारण, यातच भारताचं हित आहे. आम्ही आमच्यापासून केली आहे. मी माझा ताफा अर्ध्यावर आणला आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द केले आहे. सरकार पातळीवर इतरही निर्णय घेत आहोत, असं करताना उद्योग जगात आणि संबंधित घटकांचं हित जपलं जाईल. चला आपण सारे मिळून या अभियानामध्ये सहभागी होऊ या, राष्ट्र प्रथम या भावनेतून एकजूट होऊ या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
Next Post
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

खळबळबळ! दारूच्या नशेत भीमा नदी पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या;​ मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा