mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! ट्रॅक्टर-बैलगाडी आता कोणीच अडवणार नाही; शेतीकामांसाठी मुरूम, दगड मोफत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 7, 2026
in राज्य
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतीच्या कामांसाठी लागणारे मुरूम, दगड यांसारख्या गौणखनिजांवर आता कोणतेही स्वामित्व शुल्क (रॉयल्टी) आकारले जाणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

शेतीकामासाठी गौणखनिज वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर किंवा बैलगाड्यांवर महसूल विभाग अथवा आरटीओकडून कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतीसंबंधित विकासकामांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठा आर्थिक दिलासा

सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, शेतीसंबंधित विविध कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना गौणखनिज उपलब्ध करून देणार

जलसंपदा विभाग तसेच मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक गौणखनिज उपलब्ध करून देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

विहीर, शेतातील रस्ते, गोठा, शेतघर तसेच इतर शेतीपूरक कामांसाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे.

लाभ मिळवण्यासाठी काय करावे लागणार?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील मंडळ अधिकाऱ्यांकडे साधा अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना 15 दिवसांची अधिकृत परवानगी दिली जाणार आहे.

संबंधितांवर कायदेशीर कारवाई

ही सुविधा केवळ शेतीच्या कामांसाठीच लागू राहील. गौणखनिजाचा कोणताही व्यावसायिक वापर किंवा कमर्शियल वाहतूक आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

शेतकऱ्यांचा ट्रँक्टर आता कुठलाही तहसीलदार, पोलीस पकडणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी सभागृहात दिली.

सर्वपक्षीय आमदारांकडून स्वागत

सरकारच्या या निर्णयाचे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी स्वागत करण्यात आले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडातून दिलासा देणारा असल्याचे सांगितले.

तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रशासकीय त्रासातून मुक्ती मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी रॉयल्टी माफ

संबंधित बातम्या

पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 12, 2026
Next Post
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कोर्टाच्या चकरा मारण्यापासून सुटका! मंगळवेढा दिवाणी न्यायालयात 'विशेष लोकअदालत'; वाद मिटवण्याची मोठी संधी

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा