मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
कौटुंबिक वादातून आईने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी 1 जुलै रात्री साडे सातनंतर सांगोला तालुक्यातील घेरडीत ही घटना घडली आहे.
वैष्णवी आशिष यमगर (वय 28), तेजश्री आशिष यमगर (वय साडेतीन महिने) आणि रुद्राक्ष आशिष यमगर (वय 15 महिने) अशी त्यांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?
बुधवारी 1 जुलै रात्री कुटुंबातील ही मंडळी जेवण करीत बसली होती. वडील आशिषसोबत जेवणाऱ्या पोटच्या दोन मुलांना वैष्णवीने ताटावरून उठवलं.

लेकरांना झोपवते म्हणत घराबाहेर आणलं आणि आईने त्या दोन लेकरांसोबत त्यांच्या विहिरीत उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

मृत वैष्णवीचे वडील बाळू बाबूराव थोरबोले (रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा) यांनी या घटनेची माहिती दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आई-वडिलांनीही समजूत काढलेली
आशिष यमगर हा मुंबईत ट्रेलरवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो. त्यामुळे तो पत्नी वैष्णवी, मुलगी तेजश्री व मुलगा रुद्राक्ष असे मिळून मुंबईत कुटुंबासह राहतात.
सोमवारी कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त आशिष कुटुंबासह गावी घेरडीला आला होता. दरम्यान, पती-पत्नीत कौटुंबिक वाद झाला. त्यामुळे वैष्णवी चिडलेली होती.

बुधवारी रात्री 7:30 वाजता यमगर कुटुंबीय एकत्रित बसून घरात जेवत असताना संतापलेल्या वैष्णवीने दोन्ही मुलांना घराबाहेर नेलं. बराचवेळ झाला तरी वैष्णवी परत आली नाही, म्हणून यमगर कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला आवाज दिला असता कसलाच प्रतिसाद मिळाला नाही.

रात्री विहिरीत वैष्णवी पाण्यावर तरंगताना आढळून आली. रात्री 12 वाजता खोल पाण्यात दोन्ही मुलांचे मृतदेह मिळून आले. ते पाहून यमगर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
वैष्णवीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं
वैष्णवीचे वडील बाळू थोरबोले यांनी बुधवारी घेरडी येथे येऊन यमगर कुटुंबाशी चर्चा केली. आई-वडिलांनी वैष्णवीची समजूत काढून सायंकाळी 5:30 वाजता गावी निघून गेले होते. परंतु, वैष्णवीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं, हे तिने मुलांसह आयुष्य संपवून स्पष्ट होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज








