टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथे जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून ब्रम्हपुरी व बठाण गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप करण्यात आली असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
शासनाने गोरगरीब जनतेला घरकुलासाठी मोफत वाळू वाटप करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा मंडलाधिकारी धनंजय इंगोले,
बठाण तलाठी संदिप पवार यांनी बठाण व ब्रम्हपुरी गावातील घरकूल धारकांना ३५० ब्रास वाळू वाटप करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार, तर अन्य चार जण गंभीर जखमी
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर-झरेवाडी परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक दोन वर्षाची मुलगी ठार झाली तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेची हकीकत अशी, बुधवार दि.२५ रोजी दुपारी २.३० वाजता नंदेश्वर झरेवाडी परिसरात गंगथडे कुटूंबियाचा शिरसी येथे हॉटेल व्यवसाय असून ते शेव बनवत होते. या दरम्यान गॅसची पाईप लिकेज होवून गॅसचा मोठा स्फोट
झाला. यामध्ये दोन वर्षाची श्रेया दादासो गंगथडे हिचा या घटनेत मृत्यू झाला. तर दादासो विष्णू गंगथडे, मोनाली दादासो गंगथडे, अनुजा दादासो गंगथडे, स्वरा दादासो गंगथडे, सुनिता राहुल गंगथडे आदी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेची खबर मिळताच मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, नंदेश्वर बीटचे पोलीस हवालदार कोष्टी आदींनी सदर घटनास्थळी भेट देवून मृत्यू व जखमींची विचारपूस केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज