mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भाविकांनो! कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरपुरात 24 तास विठ्ठल दर्शन सुरू; महानैवेद्य योजनेत सहभागी होता येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 3, 2024
in शैक्षणिक, सोलापूर
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आषाढी-कार्तिकी भक्तगण येती… म्हणत पंढरीच्या पांडरायाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे, आषाढीच्या वारीनंतर भाविकांना उत्सुकता असते ती कार्तिकी एकादशीची.

कार्तिकी सोहळ्याला येणाऱ्या हजारो भाविकांना अखंड देवाच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी आज देवाचा पलंग निघणार असून आजपासून देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

आषाढी व कार्तिकी या दोन यात्रांसाठी राज्यभरातून लाखो भावी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या यात्रा कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी आजपासून देव 24 तास दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. उद्यापासून कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे.

यासाठी आषाढी व कार्तिकी यात्रा कालावधीत देवाची निद्रा बंद होत असल्याने परंपरेप्रमाणे देवाचा पलंग उद्या काढला जाणार आहे. याचाच अर्थ भक्तांसाठी विठुराया उद्यापासून 24 तास मंदिरात उभा असणार आहे.

चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढण्याची परंपरा आहे. यावर्षी कार्तिकी साठी उद्या दिनांक 04 नोव्हेंबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून सकाळी 7.30 वाजता श्रींचा पलंग काढण्यात येणार आहे.

अखंड दर्शनासाठी उभा राहणाऱ्या विठुरायाला थकवा जाणू नये म्हणून देवाच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा तक्क्या देण्यात येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर नित्य पूजा, नैवेद्य ,पोशाख आणि लिंबू पाणी या विधी व्यतिरिक्त जवळपास देव सव्वा बावीस तास भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.

श्रींचा पलंग काढण्यात आल्यानंतर काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. कार्तिकी यात्रेनंतर देवाची प्रक्षाळ पूजा दिनांक 20 नोव्हेंबर होणार असून यानंतर देवाचे 24 तास दर्शन व्यवस्था बंद होईल.

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस महानैवेद्य समर्पित करण्यासाठी रू.7,000/- देणगी देऊन महानैवेद्य सहभाग योजनेत सहभागी होता येते. त्याची दिनांक 01 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील नोंदणी देखील सुरू करण्यात आली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 224466 व 223550 या क्रमांकावर व श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथील देणगी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल मंदिर

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Next Post
ठरलं तर! अनिल सावंत यांच्यासाठी शरद पवार मतदारसंघात घेणार दोन सभा; विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे पवार साहेबांचे आदेश

वाजवा तुतारी! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांची उमेदवारी कायम राहणार; उद्या माचणूर येथून होणार प्रचाराचा शुभारंभ

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा