mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर विद्यापीठाने अंतिमची परीक्षा पुढे ढकलली; व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर झाला क्रॅश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, सोलापूर
सोलापूर विद्यापीठाने अंतिमची परीक्षा पुढे ढकलली; व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर झाला क्रॅश

 

टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठातर्फे ऑनलाइन परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्याची सुरुवात सोमवारपासून झाली आहे.


मात्र पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनातकडे निवेदन देखील दिले होते. मात्र दुसऱ्या दिवशी देखील तांत्रिक अडचण यांची समस्या कायम राहिली.

सकाळी अकरा वाजताची वेळ असताना सर्व्हर डाऊन असल्या कारणाने चार वाजता लॉगिन करण्यात यावेत अशी सूचना वेबसाइटवर दिसत होती.

मात्र चार वाजल्यानंतर देखील तीच समस्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तांत्रिक अडचणीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही त्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होत होती.

वायरस अटॅक झाल्याने विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेबसाईचे सर्व्हर क्रॅश झाले. त्यामुळे आज नियोजित एकही ऑनलाईन परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तर आज आणि उद्या (7 आणि 8 ऑक्टोबर) रोजीच्या परीक्षा देखील तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी ज्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार होत्या त्या सर्व परीक्षा 21, 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. तर एकाच वेळी सर्व्हरवर लोड येत असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रम (इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर) परीक्षांची वेळ बदलण्यात आली आहे. सकाळी 11.30 ते 4.30 ऐवजी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत.

तर 9 ऑक्टोबरपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा या पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रेणीक शाह यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी

व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाला, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लॉगीन करता आले नाही.

वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक असल्याने पेज ओपन होत नव्हते.

लॉगीन झाल्यानंतर परीक्षेची वेळ सुरु झाल्यानंतरही प्रश्नपत्रिका दिसत नव्हती.

परीक्षा सुरु असताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पेज हँग झालं, काऊंडाऊन मात्र सुरुच राहीलं

वेबसाईटवर वारंवार एरर येत होते. रिफ्रेश केल्यास परिक्षा संपल्याचा मेसेज दिसत होता.

विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या हेल्पलाईनमधील नंबर लागत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

ऑनलाईन परीक्षांच्या गोंधळावरुन एनएसयुआय आक्रमक

ऑनलाईन परीक्षा देताना येणाऱ्या अडचणींमुळे एटीकेटी आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावेत, या मागणीसाठी एनएसयुआयतर्फे निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते दुपारी विद्यार्थी विद्यापीठात पोहोचले.

मात्र यावेळी परीक्षा विभागाचे संचलाक हे कार्यालयात नसल्याने संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयाला कुलूप लावलं.

तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे, याला सर्वस्वी जबाबदार कुलगुरू असून राज्यपाल देखील यामध्ये हस्तक्षेप करत नसल्याची टीका एनएसयुआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी यावेळी केली.

Solapur University’s online exam website server crashes, exams postponed from October 6 to 8

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
Next Post
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला 'हा' निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा