mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे पाचच दिवस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 23, 2020
in सोलापूर
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स । 

सोलापुर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज करण्यास 23 डिसेंबरपासून सुरवात होणार असून, 30 डिसेंबर (दुपारी तीनपर्यंत) ही शेवटची मुदत आहे.

मात्र, 25 ते 27 या काळात सार्वजनिक सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवसच मिळणार आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 25 हजारांची मर्यादा ठरवून दिली आहे. तर 11 ते 13 उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीतील प्रत्येक सदस्याला निवडणूक कालावधीत 35 हजारांचा खर्च करता येईल, असेही निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे.

15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना 50 हजारांपर्यंत खर्च करता येणार आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील (एससी) उमेदवारास प्रत्येकी शंभर रुपयांचे डिपॉझिट द्यावे लागणार आहे.

तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठीही शंभर रुपयेच अनामत रक्‍कम असून सर्वसाधारण तथा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपयांची अनामत रक्‍कम भरावी लागणार आहे.

जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रकिया 1 ऑगस्टपासून झाली ऑनलाइन
एक खिडकी योजनेतून घ्यावा जात पडताळणी अर्ज; समितीला पडताळणीसाठी द्यावा लागणारा अर्ज तहसील कार्यालयाकडून घ्यावा,जात पडताळणी समिती कार्यालयास दिलेले पत्र,

जात पडताळणीसाठी दिलेली कागदपत्रे ऑनलाइन करावीत अपलोड
उमेदवाराने ऑनलाइन जात पडताळणी प्रस्तावाची प्रत, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह पडताळणी कार्यालयास द्यावीत
जात पडताळणीच्या प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्यांत द्यावे लागणार

एक व्यक्‍ती तथा उमेदवार एका प्रभागातून एकच अर्ज करू शकेल; एका प्रभागातून अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येईल
एका प्रभागात भरलेल्या अर्जांतून एक अर्ज वैध धरला जाईल;

एक जरी अर्ज उमेदवाराने मागे घेतला तर त्या प्रभागातून संबंधिताने माघार घेतली असे समजले जाईल

उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर उमेदवाराने हमीपत्र व घोषणापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावे
निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करीत असल्याचे हमीपत्र, अपत्यांबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र, अनामत रकमेची पावतीही बंधनकारक

ग्रामपंचायतीचा थकबाकीदार व ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व बॅंक पासबुक (राष्ट्रीयकृत तथा शेड्यूल बॅंक) द्यावे
एका प्रभागात एक चिन्ह वाटप झाल्यानंतर तेच चिन्ह त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही; 190 मुक्‍त चिन्हांपैकी एक उमेदवार निवडू शकतो पाच चिन्हे

ग्रामपंचायतींसाठी नियोजित प्रोग्राम

उमेदवारी अर्ज करणे : 23 ते 30 डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
अर्ज माघार : 4 जानेवारी (दुपारी तीनपर्यंत)
निवडणूक चिन्ह वाटप : 4 जानेवारी (दुपारी तीननंतर)
मतदान : 15 जानेवारी
मतमोजणी : 18 जानेवारी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायतनिवडणूक जाहीरसोलापूर

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
Next Post
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

सोलापुरातील प्राध्यापकासह पत्नीचे हात-पाय बांधून धाडसी दरोडा, सव्वा लाखाचा ऐवज लुटला

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 24, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा