सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून यात वित्त हानी बरोबर जीवितहानी पण झाल्याने अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ५६५ गावे बाधित झाली आहेत. Solapur district shaken by return rains! Water in 565 villages so far; 14 killed
यामुळे शेकडो घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरे दगावली आहेत.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ठाकरे सरकार काय मदत करतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ७३१ कुटुंबियांनी जिल्हा परिषद शाळा तसेच साखर कारखान्यांचा आसरा घेतला आहे. १६ हजार ९५४ नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. यावरून सोला पूर जिल्ह्यातील महापुराची भीषणता लक्षात येईल.
सोलापूर जिल्ह्यातील १७९ ठिकाणी वाहतूक सुविधांवर परिणाम झाला आहे. तसेच १३३८ घरांची पडझड झाली असून दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. एकीकडे महापुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली आहे.
बुधवारी १४ ऑक्टोंबर रात्रभर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली बाधित गाव पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.
रबर रेस्क्यू बोटद्वारे महापुरात अडकलेल्या शेकडो लोकांची सुटका करण्यात आली. याकरिता एनडीआरएफचे जवान तसेच महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान यांच्याकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे.
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज