टीम मंगळवेढा टाइम्स :
वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. याच गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस स्टेशन (सोलापूर ग्रामीण पोलीस दल) यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास मार्गदर्शक सूचना व सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

”सुरक्षित आपण, सुरक्षित समाज” या ब्रीदवाक्याला समोर ठेवून पोलिसांनी ‘चेन चोर आणि मंगळसूत्र चोर’ यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

बघा पोलिसांच्या महत्त्वाच्या सुरक्षा सूचना:
दागिन्यांची काळजी घ्या: गर्दीच्या ठिकाणी जात असताना आपले दागिने, पर्स आणि मोबाईल यांची विशेष काळजी घ्या.

दागिने उघडे ठेवू नका: मंगळसूत्र, चेन यांसारखे मौल्यवान दागिने उघडेपणाने गळ्यात किंवा हातामध्ये वाहून नेणे टाळा, जेणेकरून चोरांची नजर पडणार नाही.

संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवा: परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

बालकांची व ज्येष्ठांची काळजी: सणाच्या गर्दीत सोबत असलेल्या लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्या.
तक्रार किंवा मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक:
सणाच्या काळात कोणतीही अडचण किंवा अनुचित प्रकार घडल्यास खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन मंगळवेढा पोलिसांनी केले आहे
मंगळवेढा पोलीस स्टेशन: ☎️ 02188220333
सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष: 📱 +917030011001
तातडीची मदत (आपत्कालीन सेवा): 📞 डायल ११२

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











