mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच ‘देव दिवाळी’

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2020
in आरोग्य
दिवाळीसाठीही राज्य सरकारने नियमावली; सण साधेपणाने साजरा करा

आज 29 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘त्रिपुरी पौर्णिमा’ असं म्हणतात. तसेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ म्हणूनही संबोधलं जातं.

भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते.

अशी अख्यायिका आहे की, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला सगळे देव दिवाळी साजरी करतात आणि याच दिवशी देवांनी काशीत प्रवेश केला होता.

धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा करतात. हा कार्तिक पौर्णिमेचा सण आहे.

हा सण वाराणसीत धडक्याने साजरा केला जातो. जगातील सर्वात जुने शहर काशीची ही संस्कृती आणि परंपरा आहे. हा सण काशीच्या ऐतिहासिक गंगेच्या घाटांवर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात.

काशीमध्ये दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याचसोबत देव दिवाळीच्या दिवशी दिपदान करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. या दिवसाचं विशेष महत्त्व पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. असं मानलं जातं की, या दिवशी सगळे देव पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात.

देव दिवाळीच्या दिवशी दीप दानाचं महत्त्व :

देव दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दीप दान करणं शुभं मानलं जातं. खासकरुन मंदिरांमध्ये दीप दान करण्यात येतं. या दिवशी मंदिरांमध्ये दीप दान करावं, असं थोरामोठ्यांकडूनही अनेकदा सांगण्यात येतं.

यामुळे शुभ फळाची प्राप्ती होते. देव दिवाळी कार्तिक मासच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी रविवारी, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार असून सोमवार 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत असणार आहे.

मातीचे दिवे दान करण्याला या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी दिवे दान केल्यानं भगवान विष्णु प्रसन्न होतात, असं मानलं जातं.

तसेच जीवनात सुख आणि समृद्धि येते. या दिवशी मंदिर, पिंपळाचं झाड, तलावाच्या ठिकाणी दीपदान केलं जातं. परंतु, मंदिरात दीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, या दिवशी काशीमध्ये सर्व देव एकत्र पृथ्वीवर अवतरले होते. त्यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. यामागे एक कारण होतं, ते म्हणजे, असं सांगण्यात येतं की, देवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला कंटाळून या राक्षसाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी भगवान शंकराकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर भगवान शंकराने त्या राक्षसाचा वध केला होता.

ज्यामुळे देव अत्यंत प्रसन्न झाले होते. सर्व देव भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीमध्ये पोहोचले. त्यांनी काशीमध्ये सर्वत्र दीप प्रज्वलन केलं. आजही ही परंपरा कायम आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आजही येथे दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.(प्रभात)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दिवाळी

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Next Post
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सोलापूर-पुणे महामार्गावर धावत्या कारने घेतला अचानक पेट, गाडी पूर्णपणे जळून खाक

ताज्या बातम्या

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 17, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 17, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा