टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर जाणार्या रोडवरून बेकायदा वाळू वाहतूक करणारा टिपर पोलिसांनी पकडून चालक गणेश मायाप्पा भानवसे (वय 27 रा.बोहाळी) यास अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, हा टिपर शासकिय सेवेत असलेल्या एका कर्मचार्याचा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असून पोलिस अधिक्षक यांनी या प्रकरणाचा छडा लावून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
या घटनेची हकिकत अशी,दि.12 नोव्हेंबर रोजी रात्री 2.45 वा. मंगळवेढा-पंढरपूर जाणार्या रोडवर नंदराज हॉटेलच्या समोर यातील आरोपी गणेश भानवसे याने नदीपात्रातून
बेकायदा वाळू अंदाजे 12 हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू घेवून जात असताना सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे यांनी पकडून कारवाई केली.
याची फिर्याद चालक पोलिस नाईक समाधान यादव यांनी दिल्यानंतर टिपर चालकाविरूध्द वाळू चोरी व पर्यावरणाचा र्हास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महसूल विभाग व आरटीओला पुढील कारवाईसाठी पत्र देखील दिले आहे.
तपासिक अंमलदार पोलिस हवालदार नसीर पठाण यांनी आरोपीला अटक करून 7 लाखाचा टाटा कंपनीचा एम एच 13 ए एक्स 3838 हा टिपर जप्त करण्यात आला होता.
तपासामध्ये आरोपीनी माण नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. आरोपीस अटक करून न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती.
याची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात उभे केले असता चालकास जामीन मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, हा टिपर शासकिय सेवेतील कर्मचार्याचा असल्याचे टिपर पकडल्यापासून खमंग चर्चा होत आहे.
दरम्यान, यापुर्वीही पोलिस खात्यातील ऐका कर्मचाऱ्याचा वाळूचा टिपर तहसिलदारने पकडून एस.टी.आगारात लावला होता. तो टिपर पळवुन नेल्याने गुन्हा दाखल करून संबधीत पाेलीसाला तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी निलंबीत केले होते.
नुतन पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनीही या प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज