टीम मंगळवेढा टाईम्स ।
फॉलोअर्स वाढवण्याचे आमिष दाखवून तरुणाला ५ लाख ७० हजारांना फसवल्याची घटना जेलरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे.
याबाबत सनाउल्ला मुजमिल सय्यद (वय ३२, रा.आयेशा टॉवर, तेलंगी पाच्छा पेठ) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सनाउल्ला यांना दि.१६ऑक्टोबर रोजी जॉब पाहिजे का, असा संदेश मोबाईलवर आला. सकारात्मक उत्तर दिल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर अकाऊंट धारकाचे फॉलोअर्स वाढविण्याचे काम असल्याचे सांगितले.
तसेच वेबसाईटवर ट्रेडिंग करून कमिशन मिळविण्याचे काम असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी आरोपींनी विविध बँकांच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी ५ लाख ७० हजार रुपये भरले.
नंतर त्यांनी कामाचा मोबदला, भरलेली रक्कम परत मागितली असता, तुम्हाला ४ लाख ४८ हजार रुपये भरावे लागतील नाहीतर तुम्हाला तुमचे कमिशन व मुद्दल रक्कम मिळणार नाही, असे सांगितले.
यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज