mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2025
in क्राईम, राज्य
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्कींग ।

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत असताना सायबर गुन्ह्यांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनिअल साईटवरून 3 कोटी 60 लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं खरे नाव अभिषेक शुक्ला असून तो मूळचा लखनऊचा आहे. शादी डॉट कॉम या प्रसिद्ध मॅट्रिमोनिअर साईटवरून हे दोघे भेटले होते. फेक प्रोफाईल तयार करून या व्यक्तीनं महिलेस फसवल्याचं समोर आलं.

नेमकं प्रकरण काय?

ऑनलाईन विवाह जुळवणाऱ्या शादी डॉट कॉमच्या माध्यमातून ओळख वाढवून पुण्यात राहणाऱ्या एका महिलेला तब्बल 3 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय महाठगाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीतील एक महिला पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्याला असताना, तिची ऑनलाईन एका प्रोफाइलवरून ओळख ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ या नावाने स्वतःला ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणवणाऱ्या व्यक्तीशी झाली.

ओळखीनंतर मैत्री, आणि नंतर लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने महिलेशी जवळीक वाढवली. महिला आणि आरोपी यांनी काही काळ एकत्र वास्तव्यही केलं.

5 कोटींची पोटगी अन् फसवणूक

महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून 5 कोटी रुपयांची पोटगी मिळालेली होती. ती आपल्या व्यवसायासाठी (Mindfulness आणि Spirituality प्रोग्रॅम्स) आर्थिक गुंतवणूक करत होती.

ही माहिती मिळताच आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं आमिष दाखवलं. फसवणुकीचा बनाव रचत, आरोपीने इव्हॉन हॅन्दयानी आणि विन्सेंट कुआण या नावांची आडसावली वापरत सिंगापूर व भारतातील बँक खात्यांत वेळोवेळी रक्कम भरायला लावली.

महिलेने एकूण 3 कोटी 60 लाख 18 हजार 540 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. काही महिन्यांनंतर आरोपीने बोलणं बंद केलं आणि नंतर त्याचा साथीदार ‘विन्सेंट’ याने मेल करून त्याच्या मृत्यूची बनावट माहिती दिली. यानंतर महिलेच्या लक्षात फसवणूक झाल्याचं आलं.

पोलीस तपासात झालं प्रकरण उघड

तांत्रिक विश्लेषणद्वारे पिडीताला फसवणाऱ्या व्यक्तीचे डॉ. रोहित ओबेरॉय नसून त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला, मूळ राहणार लखनऊ, सध्या राहणार पर्थ, ऑस्ट्रेलिया असे निष्पन्न झाले. तसेच आरोपी हा बाहेरील देशात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे नावाचे लुक आउट सर्क्युलर तात्काळ जारी केले असता, दि. 25/06/2025 रोजी सदर आरोपी सिंगापूरवरून मुंबईला आल्याची खबर मिळताच मुंबई एअरपोर्टवर त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक केली असून सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे.

पोलिस तपासात समोर आलं आहे की आरोपीने शादी डॉट कॉमवरून एकूण 3,194 महिलांना मेसेज करून संपर्क साधला होता. त्यामुळे आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महिलेची फसवणूक

संबंधित बातम्या

सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 19, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 18, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 18, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
Next Post
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले 'हे' बदल

ताज्या बातम्या

सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

April 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा