mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2025
in क्राईम, मंगळवेढा, राज्य
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

शिलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा.राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली, मुळ रा.हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

घटनेनंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांसह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी संजयनगर पोलिसांची पथके सोलापूर जिल्ह्यात रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पिंटू पाटील हा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा असून तो काही वर्षापासून सांगलीत राहतो. तो मजुरीसह नवीन बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत होता.

मूळच्या हुलजंती येथील पण सध्या सांगलीतील हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते. दोघांना आठ व दहा वर्षांची दोन मुले आहेत.

सध्या विजयनगर येथील राजर्षी शाहूनगरमध्ये रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे. तिथे पिंटू व शिलवंती दोघे वॉचमन होते. बांधकामाच्या ठिकाणीच पत्र्याच्या शेडमध्ये ते राहत होते.

मागील काही दिवसांपासून दोघांत कौटुंबिक कारणावरून सतत भांडणे होत होती. या भांडणाला कंटाळून शिलवंती ही दि. १३ जून रोजी घर सोडून निघून गेली. याबाबत त्याने संजयनगर पोलिसांत फिर्यादही दिली होती.

शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती पतीकडे परत आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने लाकडी बांबूने शिलवंतीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन तो पसार झाला.

खुनाच्या घटनेचे वृत्त समजताच संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम. यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. शिलवंती हिची आई व भाऊ यांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली. दोघेही घटनास्थळी येताच शिलवंतीचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पत्नीचा खून

संबंधित बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 19, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
Next Post
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

ताज्या बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 19, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..