मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरात वर्षाअखेच्या पार्श्वभूमीवर मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याप्रकरणी आठ जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलीसांनी दिली.
दि.३१ डिसेंबर रोजी वर्षातला शेवटचा दिवस असल्याने उत्साहाच्या भरात अनेकजण दारुचे सेवन करुन मौज मजा करीत असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी वाहतूक शाखेची पथके तयार करुन शहराच्या विविध भागात नाकाबंदी केली होती.
या दरम्यान मद्य प्राशन करुन आठ मोटर सायकलस्वार नशेमध्ये मोटर सायकल चालविताना मिळून आले. दरम्यान ही कारवाई बोराळे नाका, दामाजी चौक, पंढरपूर बायपास आदी ठिकाणी करण्यात आली.
सदर आठ मोटर सायकलस्वाराविरुध्द गुन्हे दाखल करुन न्यायालयात खटले दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण जाधव, सुरज साळुंखे, सचिन काळे आदींनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज