mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! उजनी उजव्या कालव्यात उद्यापासून पाणी सुटणार; आ.समाधान आवताडे यांच्या मागणीला यश; …अन् मंत्री विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 3, 2025
in मंगळवेढा, सोलापूर
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने जादा पाणी नदीद्वारे व कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे. हे पाणी मंगळवेढा तालुक्यातील गावांना उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील गावांना सोडण्याची मागणी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली असता उद्यापासून हे पाणी सोडण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ना.विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्पाच्या सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

तसेच कालवा सल्लागार समितीची पुढची बैठक येत्या फेब्रुवारी महिन्यात घेऊन आता दिलेल्या निर्देशांची कशा पद्धतीने कार्यवाही झाली आहे याचा त्या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये आ आवताडे यांनी गतवर्षी पाच पाण्याच्या पाळ्या मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी नियंत्रणात राहिला होता त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आणि संबंधित विभागाचे अभिनंदन केले. आतापर्यंत सदर बैठका या पुणे,

मुंबई येथे घेतल्या जात होत्या परंतु चालू वर्षाची कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापूर जिल्ह्यामध्येच होत असल्याबद्दल आ.आवताडे यांनी मंत्री ना.विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

या बैठकीमध्ये तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या मांडत असताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी अद्याप पर्यंत मिळत नाही ते मिळावे अशी त्यांनी मागणी केली.

शिवाय कॅनॉल ची निर्मिती होऊन 25 वर्षे झाली कॅनॉल टेलच्या भागातील कॅनॉल ची कामेपूर्वी निकृष्ट झाल्याने अजून शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. सदर कामाची व्यवस्थित डागडुजी करून आवश्यक दाबाने शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची ही त्यांनी मागणी केली.

तालुक्यातील मरवडे, बोराळे डोणज, नंदुर, कर्जाळ, कात्राळ हुलजंती,ढवळस, मुढवी धर्मगाव, मंगळवेढा साखर कारखाना रोड या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना आजही पाण्यासाठी झगडावे लागत आहे त्यामुळे त्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे.

भीमा नदीवरील को. प. बंधाऱ्यावरील खराब झालेले दरवाजे दुरुस्तीबाबत काही नियोजन झाले आहे ? असा आ.आवताडे यांनी सवाल उपस्थित केला असता संबंधित खराब झालेल्या दरवाजांपैकी जे दरवाजे जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या परिसरात असतील त्या निडलची त्या-त्या संबंधित कारखान्यांनी दुरुस्ती आणि वापर योग्य करावेत असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले असता सर्वांनी त्यास सहमती दर्शवली आहे.

यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील, खा.प्रणिती शिंदे, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कपोले, खांडेकर, जलसंपदा अधीक्षक अभियंता धीरज साळे,

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, भारत पवार, राजन पाटील तसेच संबंधित विभागाच्या विविध खात्याचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरण

संबंधित बातम्या

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
Next Post
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

महाराष्ट्र UP-बिहारच्या मार्गावर? सोलापूरमध्ये 'वंदे भारत एक्सप्रेस'वर दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, कारण...

ताज्या बातम्या

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..