मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे पडीक जागेत आडोशाला बेकायदेशीररित्या दारु विक्री करताना महिला पोलीसांनी छापा टाकून दारु विक्रेता महिला शकिला जावीद शेख (वय ४१) हिच्या विरुध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील महिला पोलिस हवालदार वंदना ज्ञानेश्वर घोडके (वय ३८) ह्या नंदेश्वर बीट मध्ये कार्यरत असून त्यांना पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश केले होते.
पोलिस हवालदार कोष्टी व महिला पोलिस हवालदार वंदना घोडके ह्या सदर बीट मध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत शिरनांदगी येथील महिला शकिला जावीद शेख ही
तिचे घराच्या पाठीमागील जागेत आडोशाला चोरुन दारु विक्री करीत असल्याची माहिती मिळताच दि.२८ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांनी छापा टाकून अवैधरित्या ८ देशी संत्रा बाटल्या ५६० रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आल्या.
वंदना घोडके यांच्या फिर्यादीवरुन सदर आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदूर येथे बेकायदा दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलीसांचा छापा
नंदूर येथे अवैध दारु विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून ७०० रुपये किंमतीची दारु जप्त करुन शंकर हणमंत पवार याच्या विरुध्द पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी पांडुरंग भुई, पोलीस हवालदार मनोज खंडागळे, दत्तात्रय वाघमोडे आदी पोलीस कर्मचारी अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी हद्दीत फिरत असताना डोणज ते नंदूर जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदा दारु विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळताच हे
पोलीसांचे पथक मागोवा घेत सदर ठिकाणी पोहचले. पोलीसांची छापा टाकल्यावर त्यांना ७०० रुपये किंमतीच्या १० देशी संत्रा बाटल्या मिळून आल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदयाला ऊत आला असून त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी लेखी मागणी राष्ट्रवादीचे अनिल सावंत, चंद्रशेखर कोंडूभैरी व अन्य कार्यकर्त्यांनी केल्यामुळे पोलीसांची कारवाईचे हत्यार उपसले आहे.
सातत्याने आपले कर्तव्य समजून पोलीसांनी कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचा भावना नागरिकामधून व्यक्त होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज