मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आजीसोबत चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने सोलापुरात एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. शिवांशू ऊर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे.
31 मे रोजी दुपारी सोलापुरातल्या गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर हा अपघात झाला. जखमी अवस्थेत शिवांशू याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुढे आलेल्या माहितीनुसार, शिवांशू हा आपल्या आजीसोबत रिक्षातून घराकडे जात होता. रिक्षा थांबल्यानंतर तो रस्ता क्रॉस करत होता, तेव्हा समोरून दोन मुली डबलशीट दुचाकीवर आल्या. त्यांनी शिवांशूला जोरात धडक दिली.
यात त्यांच्या डोक्यात जबर मार लागला. नागरिकांनी लगेच त्याला रिक्षात घालून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. परिणामी त्या बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. शिवांशूच्या मृत्यूच्या बातमीनंतर सोलापुरात हळहळ व्यक्त केली जातेय.
पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 3 जण ठार, दोघे जखमी
दरम्यान, असाच एक भीषण अपघात खामगाव – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. टेम्पो आणि ॲपे रिक्षाच्या धडकेत तीन जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहे.
खामगाव – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नित्रुड गावाजवळ मध्यरात्री टेम्पो आणि ॲपे रिक्षाची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत.
मध्यरात्री 12 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झालाय. अपघातातील जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मयत आणि जखमी हे सिरसाळा गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या काही दिवसात या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी याच महामार्गावर ट्रकने एका दुचाकी स्वाराला चिरडले होते. त्यानंतर पुन्हा ही अपघाताची घटना घडली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज