टीम मंगळवेढा टाईम्स।
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला आयशर ट्रक गुजरातमधून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते.
पालघर, ठाणे, नवी मुंबई, सह गुन्हे प्रकटीकरण पथक अपघात केलेल्या गाडीच्या तपासासाठी कार्यरत होते. ट्रक घेऊन पोलीस मुंबईत असल्याचे कळते.
मेटे यांच्या गाडीला धडक देऊन या ट्रकने थेट पालघरच्या दिशेने पळ काढला होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकांनी सीसीटीव्ही CCTV फुटेजच्या सहाय्याने ट्रकचा नंबर शोधून चालकाला ताब्यात घेतले आहे.
डीएन 09 पी 9404 असा या ट्रकचा नंबर आहे. उमेश यादव असे चालकाचे नाव असून कासा पोलीस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केली जात आहे. ट्रकची ओळख पटवण्यासाठी ट्रकमालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विनायक मेटे यांच्या कारचा अपघात आज पहाडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात होऊन यात त्यांचा त्यात मृत्यू झाला. मेटे यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली होती.
धडक देणारा डीएन 09 पी 940 क्रमांकाचा ट्रक हा पालघरमधील कासा येथील आहे. सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी हा आयशर ट्रक चारोटी टोलनाक्यावरून गुजरातच्या दिशेने पास झाला होता. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता.
मात्र त्याला ताब्यात घेण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक उमेश यादव ट्रक घेऊन गुजरातमधील वापी येथे पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पालघर आणि रायगड पोलिसांनी वापी येथून ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
तसेच ट्रक ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक वापीला रवाना झाले होते. ट्रक घेऊन पोलीस मुंबईत येत असल्याची माहिती मिळते.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज