टीम मंगळवेढा टाईम्स।
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज सोमवार दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ८.३५ ते ९ .३५ दरम्यान शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहण करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
या समारंभास सर्व लोकप्रतिनिधी , ज्येष्ठ नागरिक , ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक , शहीद जवानांच्या पत्नी किंवा त्यांचे आई – वडील यांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
आज दिवशी सकाळी ८.३५ ते ९ .३५ दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये.
जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत : चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेच्या पूर्वी किंवा ९.३५ नंतर आयोजित करावा. दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतींवर, महत्त्वाच्या राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.
राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रीय मानचिन्हाचा कोणत्याही प्रकारचा अवमान होणार नाही, याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी . ऐतिहासिक किल्ल्यांवर देशभक्तीपर सामुदायिक गीतगायन,
प्रश्नमंजूषा , देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धा , महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाईन वेबिनारद्वारे वाद विवाद स्पर्धा, अशा कार्यक्रमांचे आयोजन शाळा व महाविद्यालयांमार्फत करावे . सोशल मीडियाद्वारे गाणी, भाषणे आयोजित करावीत.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज