mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यात ‘आदिशक्ती अभियान’, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2025
in राज्य
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे काल आयोजित विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

या अभियानाअंतर्गत राज्यातील विविध शासकीय योजना, उपक्रम आणि कार्यक्रम यांचे प्रभावी प्रसारमाध्यमांद्वारे जनजागरण करण्यात येईल. तसेच ग्रामस्तरावरून महिलांच्या समस्यांची जाण घेत त्या समस्यांचे संवेदनशीलतेने निवारण करण्यात येणार आहे.

या अभियानाची अंमलबजावणी, त्यात आवश्यक असलेल्या सुधारणा व धोरणात्मक निर्णय महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महायुती सरकारचे हे एक भक्कम व दूरदृष्टीचे पुढचे पाऊल ठरेल. राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत हे अभियान अधिक प्रभावीपणे राज्यभर राबविले जाणार आहे.

अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट

​• ​महिलांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, आर्थिक, सामाजिक आणि नेतृत्ववृद्धीस चालना देणे.
​• ​बालमृत्यू, मातामृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करणे.
​•​ पंचायतराज व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे.
​•​ किशोरवयीन मुली, अल्पवयीन मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे.
​•​ कौटुंबिक हिंसाचार व बालविवाहास प्रतिबंध करणे.

आदिशक्ती पुरस्कार देणार

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्राम, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष समित्या स्थापन केल्या जातील. या समित्यांचे वार्षिक मूल्यमापन करण्यात येणार असून, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ देण्यात येईल. हे पुरस्कार ग्रामपंचायत स्तरावर दिले जातील आणि सर्व पंचायत समित्यांना अभियानात सक्रिय सहभाग आवश्यक असेल.

समित्यांकडे काय जबाबदारी?

महिलांविषयक शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण टाळण्यासाठी दक्षता, कौटुंबिक अन्यायग्रस्त महिलांसाठी न्यायप्रक्रिया सुलभ करणे, तसेच किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन या सर्व जबाबदाऱ्या स्थानिक समितींकडे असतील.

प्रत्येक वर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत झालेल्या कामकाजाचे मूल्यमापन फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यात येईल आणि पुरस्कारांचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. या अभियानासाठी दरवर्षी अंदाजे 10.50 कोटी इतका वित्तीय भार अपेक्षित असून, त्यास राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आदिशक्ती अभियान

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून 'करारा जवाब'; दहशतवादी अड्डे उध्वस्त

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा