mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 7, 2025
in राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला भारताकडून करारा जवाब दिला जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं होतं.पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी यांच्यात बैठकांचा धडाका लावला सुरू होता.

पण भारतकशी आणि कधी कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. अखेर भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले उध्वस्त करण्यात आले आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते. भारतीय वायुसेनेकडून बुधवारी (ता.7) रात्री पावणेदोनच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु करण्यात आले.

या हल्ल्याबाबत संरक्षणखात्याकडून माहिती देण्यात आली आहे.काही वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला.ज्याठिकाणाहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग केले जात होते.

भारताने स्ट्राइकची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच, भारतीय लष्कराने ट्विटरवर पोस्ट केले, “न्याय झाला. जय हिंद.” एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानी हद्दीत मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी लक्ष्य केले असल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने बुधवारी केली. या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत एकूण 9 स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच भारतीय वायुसेनेकडून यावेळी कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारतानं बराच संयम दाखवल्याचंही यावेळी संरक्षण खात्यानं म्हटलं आहे.

तसेच पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले असल्याचंही नमूद केलं आहे.ज्यामध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती.या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही ही कारवाई केल्याचंही सांगण्यात आले आहे.या ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (डीजी आयएसपीआर) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार,भारतीय लष्करानं केलेल्या या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेत एका मुलाचा मृत्यू झाला, तर एक पुरूष आणि एक महिला गंभीर जखमी झाली.

“काही काळापूर्वी, भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानुल्लाह मस्जिद, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन ठिकाणी हवाई हल्ले केले.रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत डीजी आयएसपीआर या हल्ल्याबाबतची माहिती दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांतील संबंध प्रचंड तणावाचे झाले आहेत. अनेक कठोर निर्णय घेतले जात असतानाच दोन्ही देशांकडून युध्दाची तयारीही सुरू केली आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील राज्यांना अलर्ट केले आहे. देशातील तब्बल 244 शहरांमध्ये बुधवारी एकाचवेळी सुरक्षेच्या तयारीबाबतचे मॉक ड्रील घेतले जाणार आहे. या यादीत मुंबई, पुण्यासह उरण, तारापूर अशा महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत पाकिस्तान युद्ध सुरू

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा