टीम मंगळवेढा टाईम्स । (विशेष प्रतिनिधी):
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय विवाहित तरुण स्त्रीने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मंगळवेढा पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव शितल गणेश यादव (वय २६, रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) असे आहे.

शितल यांनी आपल्या राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस ठाण्यात नोंद; तपास सुरू
या घटनेबाबत महेश यादव (मयत शितल यांचे दीर) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. प्राप्त बातमीवरून पोलिसांनी BNSS १९४ प्रमाणे घटनेची नोंद केली आहे.

शितल यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणांमुळे उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











