mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तत्काळ मदतीकरिता कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा; आता तातडीने आर्थिक मदत मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 6, 2025
in राज्य
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढा टाईम्स न्युज

“स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजने”चा लाभ आता महाडीबीटी पोर्टल मार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असून, पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात. अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार १९ एप्रिल २०२३ पासून “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना” राबवत आहे.

या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जात असल्याची माहितीही मंत्री भरणे यांनी दिली.

पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती.

कागद पत्रांतील त्रुटी, पूर्ततेतील विलंब यामुळे अनुदान देण्यास उशीर होत होता. मात्र यावर उपाय म्हणून राज्य शासनाने हा संपूर्ण अर्जप्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही कृषीमंत्री भरणे यांनी आवर्जून नमूद केले.

ऑनलाईन अर्जप्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडता, त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील. अर्जाची सद्यस्थितीही महाडीबीटी पोर्टलवर पाहता येणार आहे. पोर्टलवर अर्ज भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर जाईल.

कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना मिळणार आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांची चकरा न मारता त्रुटी ऑनलाइनच दुरुस्त करता येतील, अशीही माहिती भरणे यांनी दिली.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावांची तपासणी करण्यात येईल आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंजुरी देईल. त्यानंतर मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकरी किंवा वारसदारांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे स्पष्ट करतानाच,

२०२५-२६ या वर्षाकरिता या योजनेसाठी १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आज अखेर ४३५९ शेतकरी प्रस्तावांना ८८ कोटी १९ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचा दावाही मंत्री भरणे यांनी केला. त्याचवेळी, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने योजना राबविल्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित होणार असल्याचा विश्वासही कृषीमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी योजना

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
Next Post

जिल्हा परिषद, महापालिकांचा बिगुल वाजण्याआधी 'या' निवडणुका पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय...

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा