mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे..! शिक्षकांच्या नोकऱ्या ‘या’ कारणांमुळे आल्या धोक्यात; शिक्षकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2021
in शैक्षणिक, राज्य
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील जवळपास 25 हजार शिक्षकांची नोकरी टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे धोक्यात आल्यानंतर आता शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

तर दुसरीकडे टीईटी पात्र शिक्षकही रिक्त जागेवर आम्हाला नियुक्त्या द्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनुदानित शाळेतील जवळपास 8 हजार आणि विनाअनुदानित शाळेतील जवळपास 17 हजार शिक्षकांच्या नोकऱ्यावर गंडांतर आलंय. त्यामुळे या शिक्षकांनी थेट दिल्ली गाठत सर्वोच्च न्यायालयात नोकऱ्या टिकवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

कारण औरंगाबाद खंडपीठाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या संदर्भातील 89 याचिका निकाली काढल्यामुळे राज्यातील 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. यातील 200 पेक्षा अधिक शिक्षकांनी दिलासा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे.

शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा पात्र नसलेल्या आणि नोकऱ्यावर असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या कायम कराव्यात अशी मागणी करण्यात आलीय.

राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 23 (1) तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने 12 फेब्रुवारी 2013 रोजी टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी बंधनकारक केली.

हा निर्णय घेतल्यानंतरही राज्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये टीईटी नसलेल्या शिक्षाकांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यानंतर केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात 2017 मध्ये सुधारणा केल्यानंतर राज्य शासनाने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी नोकरीतील शिक्षकांना 31 मार्च 2019 ची डेडलाइन दिली होती.

या तारखेपर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होतील, त्यांनाच सेवेत राहण्याची मुभा देण्यात आली होती. राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये नेमणूक केलेले 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत.

त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात टीईटीला आव्हान देणाऱ्या 89 याचिका दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांना नोकरीवर ठेवता येणार नाही, असा निर्णय दिला.

एकीकडे आपली नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांनी दिल्ली गाठली तर आता दुसरीकडे अपात्र शिक्षकांना मुदतवाढ न देता त्यांना बरखास्त करून पात्र बेरोजगार युवकांना नोकरी द्यावी, अशी मागणी करीत डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन ही संघटनेनी केलीय. ही संघटना आता अपात्र शिक्षकांच्या विरोधात बाजू मांडणार आहे.

गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये डीएड आणि बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेले हजारो विद्यार्थी टीईटीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र सरकारी पातळीवरून शिक्षक भरतीच्या कोणत्या हालचाली होत नसल्यामुळे पात्र शिक्षकांचा संताप वाढत चालला आहे.

त्यात आता पुन्हा टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याने सरकार काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिक्षक

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले

May 26, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

May 28, 2026

निर्दयी आई! पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून बाईने प्रियकरासोबत ठोकली धूम, ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून शोध सुरु

May 22, 2026
Next Post

कौतुकास्पद! सोलापूर विद्यापीठाची व महाविद्यालयीन शैक्षणिक फी, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा