mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

टेन्शन वाढवणारी बातमी! महाराष्ट्र सरकारकडून ‘या’ 2 सुट्ट्या रद्द; सर्वाधिक गर्दीच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवावं लागणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 11, 2025
in राज्य, शैक्षणिक
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

राज्यातील शाळांना नुकतीच नारळीपौर्णिमेची सुट्टी देण्यात आली. तसेच पुढील महिन्यामध्ये गौरी-गणपतीसाठीही सुट्टी देण्यात येणार असल्याचं राज्य शासनाने 7 ऑगस्टला जाहीर केलं.

मात्र या सुट्ट्या देताना राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन असताना आणि दहीहंडीच्या दिवशीच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्यामुळेच आता या दोन्ही दिवशी शाळा भरवल्या जाणं अपेक्षित असलं तरी केलेला हा बदल

विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. पालकांनाही ज्या दोन दिवशी बाहेर प्रचंड गर्दी असते अशा दिवशी सुट्ट्या रद्द करणे चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250810-WA0044.mp4

शहरातील सर्वाधिक गर्दीचे दिवस

मुंबईमध्ये सर्वाधिक गर्दी असलेले दोन सण म्हणजे अनंत चतुर्दशी आणि दहिहंडीचा दिवस. या दोन्ही दिवशी वाहतूक व्यवस्थेचं विशेष व्यवस्थापन केल्यानंतरही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. गोविंदा पथकेही दहिहंड्या फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरात जागोजागी फिरत असतात.

अनेक चौकांमध्ये मोठ्य मोठ्या हंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं असतं. याच कारणामुळे अनेक मार्ग पूर्णपणे किंवा तत्वत: बंद असतात. विसर्जन मिरवणुकांमुळेही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो.

आधीच एवढा गोंधळ असताना अशा दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावं लागणं हे अपघातांना आमंत्रण देण्यासारखं असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. या दिवशी सुट्टी दिली नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासन घेणार आहे का? असा सवाल पालक आणि शिक्षक विचारत आहेत.

विद्यार्थी गर्दीत हरवले तर…

या दोन्ही दिवशी प्रचंड गर्दी रस्त्यावर असते. त्यामुळे शाळेत येताना अथवा जाताना एखादा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी हरवली तर त्याची जबबादारी शासन घेणार आहे का? असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जातोय.

निर्माण झाला संभ्रम

लहान मुलांमध्ये सणासुदीला विशेष उत्साह असतो अशा दिवशी रस्त्यावर गर्दी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं पटण्यासारखं नाही. सुट्ट्यांमध्ये केलेले बदल व्यवहार्य नाहीत, अशी टीका पालकांनी केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली ही सुट्ट्यांची परंपरा अचानक बदलून नवा संभ्रम पालकांमध्ये तसेच शाळा व्यवस्थापनामध्ये निर्माण झाला असून हे असं करणं योग्य नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

1. राज्य सरकारने शाळांच्या सुट्ट्यांबाबत कोणता निर्णय घेतला आहे?

राज्य सरकारने नारळीपौर्णिमेसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, तसेच पुढील महिन्यात गौरी-गणपतीसाठीही सुट्टी देण्याची घोषणा 7 ऑगस्ट 2025 रोजी केली. मात्र, अनंत चतुर्दशी (गणपती विसर्जन) आणि दहीहंडीच्या दिवशीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

2. अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी सुट्ट्या का रद्द केल्या?

राज्य सरकारने याबाबत स्पष्ट कारण दिलेले नाही. मात्र, या निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे, कारण या दोन्ही दिवशी मुंबईत प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

3. या निर्णयाविरोधात शिक्षक आणि पालकांचे मुख्य आक्षेप काय आहेत?

शिक्षकांचे म्हणणे आहे की, अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी रस्त्यांवर प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे धोकादायक आहे. पालकांचे म्हणणे आहे की, या सणांच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे सुरक्षित नाही आणि सुट्ट्या रद्द करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही.

4. अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी कोणत्या समस्या उद्भवतात?

या दोन्ही दिवशी मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुका आणि गोविंदा पथकांमुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. अनेक मार्ग पूर्णपणे किंवा तात्पुरते बंद असतात. वाहतूक व्यवस्थापन करूनही वाहतूक कोंडी टाळता येत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे जोखमीचे ठरते.

5. पालकांनी कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत?

पालकांनी विचारले आहे की, या गर्दीच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत येताना-जाताना एखादा विद्यार्थी हरवला किंवा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी शासन घेणार आहे का? तसेच, सणासुदीच्या उत्साहात लहान मुलांना शाळेत पाठवणे योग्य नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शाळांना सुट्टी

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; व्यापाऱ्याने चिटी लिहून संपवले जीवन; तर  खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळलेल्या मंगळवेढ्यातील तरुणाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा