टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील मार्केट यार्डात लावलेली २५ हजार रुपये किमतीची मोटर सायकल अज्ञात चोरटयाने पळविण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रमोद जाधव (रा .जित्ती) हे दि.९ रोजी सकाळी ८.०० वा.मंगळवेढा शहरातील
मार्केट यार्डात विराज हॉटेलसमोर मोटर सायकल (एम.एच १३ डी.बी. ६४९८) ही लावून भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते.
फिर्यादी माघारी आल्यानंतर सदर ठिकाणी मोटर सायकल दिसून आली नाही. अज्ञात व्यक्तीने मोटर सायकल पळविल्याचे लक्षात आल्यानंतर सदर व्यक्तीविरूध्द फिर्याद देण्यात आली.
मोटर सायकलची मोटर सायकलला धडक, दोघे जखमी
गोणेवाडी मार्गावर निष्काळजीपणे मोटर सायकल चालवून रस्त्याने जाणाऱ्या मोटर सायकलला पाठीमागून धडक देवून त्यावरील दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी कुशाबा पडवळे (रा.खुपसंगी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी सुखदेव बंडगर व त्यांचा मित्र गजानन चौगुले (रा.गोणेवाडी) हे दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४.०० वा . गोणेवाडी येथील
पंढरी मिल्क डेअरीसमोरून जात असताना आरोपी कुशाबा पडवळे याने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटर सायकल चालवित फिर्यादीचे मोटर सायकलीस पाठीमागून धडक देवून फिर्यादी व त्याचा मित्र यांना गंभीर जखमी केले.
या जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. जखमी फिर्यादी तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने फिर्याद दाखल केली आहे.
या अपघातामध्ये मोटर सायकलचे १० हजाराचे नुकसान केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज