mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ५ संस्थेच्या २० आश्रम शाळेवर प्रशासक; मंगळवेढ्यातील ‘या’ शाळांचा समावेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 10, 2022
in शैक्षणिक, सोलापूर
मुलांना अभ्यासाची व शाळेची आवड, ओढ कायम राहण्यास सुरुवात होणार; मंगळवेढ्यातील ‘ही’ शाळा बाराही महिने सुसाट धावणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात.

त्यांचे शैक्षणिक मागासलेपण दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या संस्थामार्फत निवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. अशा आश्रम शाळांना शासनाकडून अनुदान दिले जाते.

परंतु संस्थांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवल्या जात नाहीत, हे तपासणीअंती स्पष्ट झाल्याने व शासनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ५ संस्थांच्या २० शाळेवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रशासक नेमला आहे.

यात साईबाबा तरुण मंडळ अक्कलकोट संचलित प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा व उच्च माध्यमिक आश्रम शाळा नागणहळ्ळी ता.अक्कलकोट,

शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रम शाळा, उच्च माध्यमिक आश्रम शाळा यड्राव ता. मंगळवेढा तसेच प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा पडोळकरवाडी,

नाईक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद संचलित प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा, उच्च माध्यमिक आश्रम शाळा तांबेवाडी ता. बार्शी,

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड ता. माढा संचलित प्राथमिक आश्रम शाळा, उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड ता. माढा मागास सेवा मंडळ नेहरूनगर संचलित प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा, नेहरूनगर प्राथमिक आश्रम शाळा,

माध्यमिक आश्रम शाळा मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा जामगाव बुद्रुक ता.मोहोळ अशा ५ संस्थेतील २० आश्रम शाळेवर राज्य शासनाने प्रशासक नेमला आहे.

निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात चांगले शिक्षण देणे हा शासनाचा मुख्य हेतू आहे. त्यानुसार आश्रम शाळेमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवणे ही संबंधित संस्थांची जबाबदारी आहे.

परंतु बऱ्याच वेळा या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसते.(स्रोत:पुण्यनगरी)

सहायक आयुक्त प्रशासकपदी

आश्रम शाळा संहितेनुसार ज्या आश्रम शाळा शासनाने विहित केलेल्या ध्येय धोरणानुसार चालवल्या जात नाहीत, त्या आश्रम शाळेवर आश्रम शाळा संहिता प्रकरण ३ मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते.

आता सदर आश्रम शाळेवर समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

व प्रशासक यांनी तातडीने पदभार घेऊन कार्यवाही अहवाल तात्काळ पाठवण्याचे आदेश उपसचिव कैलास साळुंके यांच्याच पत्राने देण्यात आले आहेत.

इतर आश्रम शाळेतही खळबळ

सोलापूर जिल्ह्यात आश्रम शाळेचा कारभार पारदर्शक आहे असे नाही. सध्या काही जात्यात आहेत तर काही सुपात आहेत. त्यामुळे येत्या काळात सुद्धा ज्या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या निधीवर डल्ला मारून कोट्यधीश झाले, तशा संस्थाचालकांनाही आता चाप बसणार आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आश्रम शाळाप्रशासक
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

March 21, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली सोलापूरच्या तरुणाची फसवणूक

March 21, 2023
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी; आणखी एका महिलेचा मृत्यू

March 21, 2023
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

मोठी बातमी! माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना घेतले ताब्यात

March 20, 2023
नागरिकांनो! न्यायालयात आपली बाजू मांडता यावी यासाठी ‘या’ कार्यालयाकडून गरजूंना मिळणार मोफत वकील

नागरिकांनो! न्यायालयात आपली बाजू मांडता यावी यासाठी ‘या’ कार्यालयाकडून गरजूंना मिळणार मोफत वकील

March 20, 2023
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

पालकांनो! शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

March 20, 2023
Next Post
खळबळ! लवंगी ग्रामपंचायत कामामध्ये मोठा भ्रष्टाचार, सरपंचास अपात्र करण्याची मागणी;…अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा

खळबळजनक! मंगळवेढा तालुक्यातील ४९ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस

ताज्या बातम्या

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा; सर्व प्रकारची कर्ज, ग्राहकांसाठी फायदेशीर योजना

March 22, 2023
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

March 22, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांना कार्यरत्न पुरस्कार जाहीर

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत 11 व्या फेरीनंतर कोण आघाडीवर? मतमोजणी कल बघा…

मोठी बातमी! आज सुट्टीच्या दिवशीही ‘हे’ शासकीय कार्यालयं चालू राहणार

March 22, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा