टीम मंगळवेढा टाईम्स।
यंदा पाऊस चांगला पडण्याचा अंदाज असल्याने कृषी खात्याकडून खरीप पेरणीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी होईल असा अंदाज असल्याने सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका आदी ६४ हजार ३०२ क्विंटल बियाणे आवश्यक आहे.
संपूर्ण खरीप हंगामासाठी ३ लाख ६७ हजार ३०२ मे. टन इतका विविध प्रकारचा रासायनिक खत उपलब्ध करण्यात येत असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
मागील चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात खरिपाच्या पेरणी क्षेत्रात वरचेवर वाढ होत आहे. सोयाबीन पेरणी क्षेत्रात दरवर्षीच भर पडत असल्याचे कृषी खात्याकडील आकडेवारीवरून दिसत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात एकट्या सोयाबीनचा पेरा १ लाख ११ हजार १६ हेक्टर क्षेत्रात होईल तर त्यासाठी ३८ हजार ८८६ क्विंटल बियाणे (खासगी, महाबीज, घरगुती) आवश्यक असल्याने उपलब्ध करण्यात येत आहे. महाबीज कडून १० हजार क्विंटल बियाणे मागविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
सोयाबीन नंतर जिल्ह्यात तुरीचे ८६ हजार हेक्टर पेरणी नियोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रासाठी ५ हजार १५ क्विंटल बियाणे आवश्यक आहे. उडीद पेरणीसाठी ही शेतकऱ्यांचा कल वाढल्याने यंदा ७० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करीत ५ हजार ६५० क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे.
मका जवळपास ६१ हजाराहून अधिक क्षेत्रावर पेरणीचा अंदाज व्यक्त करीत १० हजार क्विंटल बियाणे आवश्यक आहे. बाजरी ४० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होईल व त्यासाठी ९०५ क्विंटल बियाणे, मूग १६ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार असल्याने ८७४ क्विंटल बियाणे,
सूर्यफुलाचे पेरणी क्षेत्र वाढविण्यावर भर
यंदा सूर्यफुलाचे पेरणी क्षेत्र वाढण्यासाठी कृषी खाते शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. मागील वर्षी कसेबसे १९०० हेक्टरपर्यंत झालेले पेरणी क्षेत्र यंदा १३ हजार हेक्टरवर कसे जाईल, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक बियाणे मागविण्यात आले आहे.
खतांची टंचाई भासू नये यासाठी..
खरीपासाठी सरासरी २ लाख ८ हजार मेट्रिक टन खत आवश्यक आहे. मार्च अखेरपर्यंत १ लाख ३६ हजार ७४३ मेट्रिक टन खत शिल्लक होता. खरीप हंगामासाठी २ लाख २९ हजार ७०० मेट्रिक टन खत मागणी केला आहे. म्हणजे खरीपासाठी ३ लाख ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.(स्त्रोत:लोकमत)
आवश्यकतेनुसार बियाणांची मागणी करण्यात आली
शेतकरी पेरणीचे नियोजन अगोदरच करुन ठेवतात. आवश्यकतेनुसार बियाणांची मागणी करण्यात आली आहे. पाऊस पडेल त्या परिस्थितीनुसार बियाणे व आवश्यक खतांचा पुरवठा करुन घेतला जाईल. पाऊस पेरणीसाठी चांगला पडेल असे गृहीत धरण्यात आले आहे. दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज