टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जोरदार पाऊस हा सोलापूर जिल्ह्यासाठी चांगला मानला जातोय.
कारण पुणे जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत असतो. सध्या पुण्यात जोरदार पाऊस सुरु असून, उजनीत सकाळपासून 47000 क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे.
थोड्या वेळात हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तसेच पारगावमध्ये देखील 68000 क्युसेक विसर्गणे पाणी येत आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने वरच्या धरणातूनही पाणी सोडणे सुरू झाले आहे.
उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं पाणीपातळी वाढली आहे. धरणात 53 टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणात वजा 14 टक्के एवढे पाणी आहे. सध्याची स्थिती पाहता उद्या संध्यकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर; पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आली. त्यामुळे कोल्हापूर शहरासह परिसर महापुराच्या उंबरठ्यावर आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पातळी 43 फुटांवर गेली आहे.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण 99 टक्के भरले. कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने तिकडच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील 90 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
चिखली आणि आंबेवाडी गावचा अंशत: संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती दलातील तुकडी सज्ज करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज