मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शेतीच्या कारणावरून मुलाने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना कासेगाव (ता. द. सोलापूर) येथे ८ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता घडली. याबाबत वडिलांनी मुलाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत गुलाब महंमद तांबोळी (वय ७८, रा. कासेगाव, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मदार गुलाब तांबोळी (वय ३७, रा. कासेगाव) याच्याविरोधात

भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम ११८ (१), ३५२ नुसार सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ८ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता फिर्यादी हे वॉचमन ड्युटी करून परत गावात आले. गावातील महादेव मंदिरासमोर असलेल्या मठासमोर थांबले असता,

फिर्यादींचा मुलगा मदार हा त्याच्या मोटारसायकलवरून आला. फिर्यादीला पाहून गाडीवरून खाली उतरला अन् शिवीगाळ व दमदाटी करत हातातील चाकूने डोक्यात मारून जखमी केले.

यावेळी गावातील लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेनंतर फिर्यादीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल भंडारी हे करत आहेत. या घटनेत पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे सांगण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













