mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 11, 2026
in राष्ट्रीय
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

भारत देशासह जगातील अनेक देश काही आव्हानांचा सामना करत आहेत. विविध देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संकटाला तोंड देत असताना सुजाण नागरिक म्हणून आपण काही गोष्टी करायला हव्यात.

पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळावी, परदेशी प्रवास टाळावा तसेच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल त्यांनी मते मांडली. यावेळी त्यांनी देशवासियांना उद्देशून त्यांनी प्रमुख नऊ आवाहने केली.

प्रामुख्याने सोने खरेदी टाळावी आणि पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा, या मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढावणार आहे, याबद्दल लोकांच्या मनात संशयाचे धुके दाटले आहे.

नरेंद्र मोदी यांची देशवासियांना उद्देशून कोणती नऊ आवाहने

पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत, खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा, पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका, वर्षभर परदेशी प्रवास टाळा, कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे,

परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा, वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या, परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचवण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी, नागरिकांना एका वर्षासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मोदींनी अशी आवाहने करण्यामागे कारण काय?

इराणविरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेने थांबल्याचे जाहीर केले आहे. मात्र, होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कायम आहे. अमेरिका-इराण संघर्ष अर्थात या युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला आणि इंधन पुरवठ्याला बसत आहे. कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ११० ते १२० डॉलरपर्यंत पोहोचल्याने भारतात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक अस्थिरतेमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे भारताच्या आयात-निर्यातीवर, विशेषतः खते आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांत भारतीय बाजारातून अंदाजे १४ हजार २३१ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतीयांनी एक वर्ष सोने खरेदी केले नाही तर काय होईल?

भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खरेदीदारांपैकी एक आहे. लग्नसमारंभांपासून ते गुंतवणुकीपर्यंत, भारतीयांचे सोन्याशी घनिष्ठ नाते आहे. परंतु जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी एक वर्षासाठी सोने खरेदी केले नाही तर त्याचा परिणाम केवळ दागिन्यांच्या बाजारपेठेपुरता मर्यादित राहणार नाही. यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रुपया, व्यापार तूट आणि गुंतवणुकीच्या पद्धतींमध्येही महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात.

एक वर्ष सोनं खरेदी बंद झाल्यास काय बदलेल?

जर भारतीयांनी एक वर्ष सोनं खरेदी कमी केलं किंवा पूर्णपणे थांबवलं तर त्याचा सर्वात मोठा परिणाम देशाच्या आयात बिलावर दिसून येईल. सोन्याची आयात घटल्यास सरकारला परकीय चलनाची मोठी बचत करता येऊ शकते.

यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयावरील दबावही घटू शकतो. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते यामुळे भारताचा करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट कमी करण्यास मदत होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास देशातील पैसा परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकासकामांसाठी अधिक वापरला जाऊ शकतो.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोने खरेदी करू नका

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 9, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 9, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 8, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा