टीम मंगळवेढा टाईम्स।
बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांना पाहताच चालकाने वेगाने पळाल्याने त्यामध्ये वाहन पलटी होवून एकाचा मृत्यू तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली असून
या प्रकरणी वाहन चालक सुरज शहाजी चव्हाण (रा.सांगोला), गणेश दत्तत्राय मस्के, गणेश भाऊसाहेब मस्के, देवल शक्तीमान उघडे (रा.शिरगाव ता.पंढरपूर),वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड (रा.ओझेवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी पोलीस नाईक ईश्वर दुधाळ व पोलीस हवालदार श्रीमंत पवार,पोलीस अंमलदार कदम हे दि.22 रोजी 4 वाजता पेट्रोलिंग करीत उचेठाण परिसरात आले असता
त्यांना मुढवी येथून एक अवैध वाळू वाहतुक करणारे वाहन आले होते. यावेळी कारखाना चौकात पोलीस थांबले असता त्यांना पाहून पांढर्या रंगाचे चार चाकी एन्ट्रा वाहन येत असल्याचे पोलीसांना वाळू वाहतूकीचा संशय आल्याने वाहन थांबविण्याचा इशारा केला,
मात्र ते वाहन पुढे तसेच उचेठाण गावच्या दिशेने जात असताना गडदे वस्ती येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ते पलटी झाले. पोलीसांनी सदर घटने ठिकाणी पाहणी केल्यावर तीन इसम जखमी अवस्थेत रोडवर पडले होते त्यांचे डोकीस,पायास,हातास जखमा झाल्या होत्या.
सदर इसमांची चौकशी केली असता वाहन चालक सुरज चव्हाण व हौद्यात पाठीमागे बसलेले गणेश दत्तात्रय मस्के,गणेश भाऊसाहेब मस्के,देवल शक्तीमान उघडे,वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीसांनी 2 लाखाचा एन्ट्रा चार चाकी वाहन,2 हजार किंमतीची अर्धा ब्रास वाळू असा एकूण 2 लाख 2 हजार रुपयाचा मुद्देमाल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान भीमा व माण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू आहे. यावर वेळीच आवर घालण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नाही
दामाजी कारखाना चौकात उचेठान कडे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या येन्ट्रा गाडीला हात दाखवून पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते वाहन न थांबता भरधाव वेगाने गेल्यावर पुढे काही अंतरावर जावून पलटी झाल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नाही या घटनेबाबत संबधित वाहन चांलकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.- महेश ढवाण, पोलिस निरीक्षक मंगळवेढा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज