टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोटचा गोळा म्हातारपणी आपला सांभाळ करेल, या आशेने आईने विश्वासाने मुलाच्या नावे मालमत्तेचे बक्षीसपत्र केले. पण, मुलगा सांभाळत नसल्याची तक्रार घेऊन गेलेल्या त्या मातेला प्रांताधिकाऱ्यांनी न्याय दिला.
आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्यानुसार दाखल अर्जाचा निकाल प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे.
शहर बार्शी म्युनिसिपल हद्दीतील बागायत जमीन, विहिरीवर जाणे येण्याच्या हक्कासह सर्व मिळकती वहिवाटी हक्कासह ज्येष्ठ महिलेच्या मालकीच्या होत्या. आता तिचे वय झाले होते आणि तिला दोन मुले आहेत.
२० गुंठे क्षेत्र महिलेच्या हिश्श्याला आले आणि त्या मालमत्तेची ज्येष्ठ महिला स्वतंत्र एकटी मालक झाली आणि त्याप्रमाणे महसूल दप्तरी सर्व नोंदी झाल्या.
नोंदीप्रमाणे ज्येष्ठ महिला स्वतः ती जमीन वहिवाटत होती. मग मुलाने, ‘तू महिला आहेस, तुझे आता वय झाले आहे, तू कशी जमीन करणार? माझ्या जमिनीसह तुझी जमीनही मला करायला मिळाली तर शासनाचे वेगवेगळे फायदे घेता येतील. मी तुला सांभाळणार आहे.
तुझी देखभाल करणार आहे. दवाखान्यासह सर्व खर्च पण मीच करणार आहे. त्या बदल्यात तू मला बक्षीसपत्र करून दे’, असे म्हणत तो सतत आईकडे तगादा लावू लागला. बक्षीसपत्र करून देण्यासाठी नैतिक दबाव टाकला. शेवटपर्यंत चांगले सांभाळेन, देखभाल करण्याचे आश्वासन दिले.
त्याच्या भावनिक आश्वासनांना बळी पडून महिलेने त्याच्या म्हणण्याप्रमाणे २८ ऑक्टोबर २०१० रोजी बक्षीसपत्र करून दिले.
पण, दोन-तीन वर्षांपासून मुलगा कसलाही सांभाळ किंवा देखभाल करत नाही. विचारपूसही करत नाही. तिची बॅग वगैरे घराबाहेर फेकून देऊन तिला घरातून हाकलून दिले.
त्यामुळे महिलेने ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे वादग्रस्त मिळकतीचे मुलाच्या नावे करून दिलेले बक्षीसपत्र रद्द करून जमीन मागण्यासाठी बार्शीतील अॅड. शिवाजी क्षीरसागर, अॅड. पवन क्षीरसागर, अॅड. अक्षय बिडबाग यांच्या मदतीने प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता.
प्रांताधिकाऱ्यांच्या निकालाने वृद्धेला न्याय
आई, वडील व वरिष्ठ नागरिक यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांना सन्मानाने आयुष्य व्यतीत करता यावे या उद्देशाने आई- वडील व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ साली अमलात आला आहे.
या मातेच्या अर्जावर प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्यानुसार ते बक्षीसपत्र शून्यवत ठरविल्याचा निकाल जाहीर केला. या निकालामुळे ज्येष्ठ नागरिक महिलेला मोठा दिलासा मिळाला.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज