mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 24, 2025
in सोलापूर
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

उजनी धरणात मिसळणारा दौंड येथील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. दौंड येथून ११ हजार ७१९ क्युसेक विसर्ग सोमवारी सायंकाळी ६ वाजता सुरू होता. रविवारी सायंकाळी १५ हजार २३३ क्युसेक होता.

धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी ‘उजनी’तून सोमवारी दुपारी आणखी ५ हजार क्युसेक विसर्ग वाढवून भीमा नदीत ३० हजार करण्यात आला आहे. रविवारी २५ हजार क्युसेक होता.

सोमवारी सायंकाळी उजनी धरणाची पाणीपातळी ७५.६७ टक्के आहे. रविवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी ७६.९८ टक्क्यांपर्यंत होती. २ टक्के पाणी तळी कमी करण्यात यश मिळवले आहे.

भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्यामुळे बंडगार्डन येथील विसर्गात देखील मोठी घट झाली आहे.

पंढरपूर आषाढी वारीमुळे उजनीची पाणीपातळी स्थिर ठेवण्याचे प्रयत्न उजनी धरण व्यवस्थापन करीत आहे. सध्या धरणात एकूण १०४.२० टीएमसी पाणीसाठा असून ४०.५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरला आहे.

उजनीतून भीमा नदीत वीजनिर्मिती १ हजार ६०० क्युसेक, उजनी मुख्य कालवा ५०० क्युसेक, भीमा-सीना जोडकालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

भीमेत विसर्ग वाढला; बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती पंढरीचा दगडी पूल उद्या पाण्याखाली जाणार

उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

विसर्ग वाढल्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात जाणार आहेत. वाढता विसर्ग, आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्शवभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

काही दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६,५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये ३१,६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे.

त्यामुळे सद्य:स्थितीतील दोन्ही धरणांतून येणारा विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग राहणार आहे. या विसर्गामुळे एक महिन्यात दुसऱ्यांदा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथील जुना दगडी पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

आषाढी यात्रेनिमित्त येणारे भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भीमा नदीवरील बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.

भीमा नदीची पाणीपातळी वाढल्याने येथील चंद्रभागा नदी पात्रात असलेली सर्व मंदिरे पाण्याने वेढली जाणार आहेत. तसेच पाण्याची पातळी घाटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात स्नान करणाऱ्या भाविकांना सावधानता बाळगावी लागणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी प्लस

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा