mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 30, 2026
in राज्य
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील प्रथमेश मोहन राठोड या 19 वर्षीय तरुणाने नीट परीक्षेत पास होईल का?

या विवंचनेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या आठवणीत हंबरडा फोडलाय. पेपर फुटल्यानंतर आता कसे होईल? असे तो म्हणत होता,

असे त्याच्या कुटुंबियांने सांगितले. शिवाय का हे पेपर फुटीवाले सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत, असा सवाल ही त्यांच्या कुटुंबीयांने उपस्थित केलाय.

परीक्षा दिल्या नंतर तो फार आनंदी होता, मात्र पेपर फुटला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं…

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील रहिवासी मोहन राठोड यांचा मुलगा प्रथमेश राठोड हा इयत्ता बारावी शिक्षण घेत होता. प्रथमेशनांदेड येथे नीटची तयारी करीत होता. चार दिवसापूर्वी तो गावाकडे आला होता. बुधवारी रात्री जेवण करून आम्ही झोपलो. प्रथमेश राठोड हा अभ्यासासाठी त्याच्या रूममध्ये गेला.

गुरुवारी मध्यरात्री एक वाजता प्रथमेश राठोड हा उलट्या करत असल्याचा आवाज त्याच्या आईला आला. त्याची आई प्रथमेश जवळ गेली, असता विषारी औषधाचा वास आला.

त्यावेळी त्याला विचारले असता त्याने मी नीट परीक्षा पास होईल का असे बोलला.

आरडाओरड्याचा आवाज ऐकल्यानंतर आम्ही त्याला प्रथम उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे विनायक राठोड यांच्या तक्रारीवरून प्रथमेश याने नीटची परीक्षा पास होईल का? अशी धसकी घेऊन विषारी औषध प्राशन केल्याची नोंद करण्यात आली. सध्याया प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

विषारी द्रव्य पिऊन जीवनयात्रा संपवली, अवघं कुटुंब हळहळल

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि बंजारा समाजातून खडतर प्रवास करून पुढे आलेल्या प्रथमेश राठोड ने नीट परीक्षा दिल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयाला विश्वास होता की प्रथमेशला चांगले मार्क पडतील आणि तो डॉक्टर होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकेल.

मात्र पेपर फुटला आणि होत्याचे नव्हते झाले. आता पुन्हा पेपर द्यावा लागेल, पुन्हा नव्याने तयारी करावी लागेल, या एक ना अनेक आशा प्रश्नांनी प्रथमेशला ग्रासले होते. त्यातूनच त्याने विषारी द्रव्य पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आणि अवघ कुटुंब हळहळलय.

पेपर देवून आला तेंव्हा खूप खुश होता, पण…

पेपर देवून आला तेंव्हा खूप खुश होता पण. जेंव्हा पेपर फुटल्याचे कळले तेंव्हा खूप टेन्शनमध्ये आला होता. म्हणत होता, आई आता कसे होईल. मी म्हणाले होते, टेन्शन घेवून नको. अशी प्रतिक्रिया प्रथमेशच्या आईने देत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. माझा पेपर खूप छान गेलेला आहे, पण पेपर फुटीचे प्रकरण आले तेंव्हा तो खूप टेन्शनमध्ये आला. आता पुढचा पेपर कसा जाईल? असे तो म्हणत असल्याचे प्रथमेशचे वडील म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नीट परीक्षा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
Next Post
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! 'राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे'त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा