मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील मोहम्मद मेहबूब मुजावर यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात अवैध सावकाराविरोधात दिलेल्या तक्रारी अर्जानुसार
मंगळवेढा-खोमनाळ रोडवरील सावकाराच्या राहत्या घराची झाडाझडती घेऊन पंचांसमक्ष आक्षेपार्ह कागदपत्र जप्त केल्याची माहिती येथील सावकारांचे निबंधक तथा सहाय्यक निबंधक व्ही. व्ही.वाघमारे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगरगाव रोड, मंगळवेढा येथील मोहम्मद महबूब मुजावर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एका अवैध सावकाराकडून आपल्याला त्रास होत असल्याची लेखी तक्रार येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात दिली होती.
त्यानुसार दि. २८ मे रोजी मंगळवेढा खोमनाळ रोडवरील त्या सावकाराच्या शेतातील राहत्या घरी पोलीस बंदोबस्तात घरझडती घेतली असता प्रथमदर्शनी अवैध सावकारी बाबतची आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली असून त्याची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
कारवाई करतेवेळी सहायक निबंधक व्ही. व्ही. वाघमारे, सचिन जाधव विलास घोडके, वैभव चव्हाण, पंच लिंगाणा पाटील, डी.डी. भंडगे, एम.टी. भंडगे आदी उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी खुलेआम सुरू असून व्याजाचा दर २० ते ५० टक्के पर्यंत आकारला जात आहे.
व्याज व मुद्दल देताना आल्यामुळे अनेकांनी गाव सोडले आहे. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात सावकारकी मोठ्या प्रमाणात बोकाळली असून याप्रकरणी संबंधित विभागाने सुमोटो कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज