टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजाची संधी भाविकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यात आहे.
श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करता येणार आहे.
दि.१ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील पूजांची नोंदणी भाविकांना करता येईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
याबाबत मंदिर समितीची दि. २० ऑगस्ट रोजी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
भाविकांना पूजेची नोंदणी https:/ www.vitthalrukminima ndir.org या मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून प्रत्न करावा. दि. ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६ -२९९२९९ वर भाविकांनी संपर्क साधावा, असे मनोज श्रोत्री यांनी केले आहे.
सण, उत्सव, गर्दीचे दिवस वगळून पूजेची असेल संधी
नित्य पूजेसाठी २५ हजार रुपये व श्री रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी ११ हजार रुपये तसेच पाद्य पूजेसाठी ५ हजार रुपये व तुळशी पूजेसाठी २ हजार १०० इतके देणगी मुल्य आहे.
दि. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी सोय करून देण्यात येत आहेत. नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयात असे राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज