mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात नवा स्ट्रेन कार्यान्वित? पाच तालुक्यांतील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 5, 2021
in सोलापूर, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाल्याने नवा स्ट्रेन कार्यान्वित झाला आहे काय हे तपासण्यासाठी शहरासह पाच तालुक्यांतील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, माळशिरस, करमाळा या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत.

विदर्भासारखा या परिसरात कोरोणाच्या विषाणूत बदल झाला आहे काय याबाबत शंका उपस्थित केली जात होती. आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.प्रदीप व्यास यांनी नव्या स्ट्रेनच्या तपासणीबाबत नमुने पाठविण्याची सूचना केली होती.

हे नमुने सिव्हिलच्या प्रयोगशाळेने पाठवावेत असे ठरले हाेते. त्यानुसार सिव्हिलच्या प्रयोगशाळेने १ मार्च रोजी ९ नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.

पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविलेले नमुन्यात शहरातील ४, करमाळा, माळशिरस, माढा, पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांचा समावेश आहे.

पंढरपूर, करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यांत काेरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही आता याच तालुक्यात आढळत आहे.

हे तालुके सीमावृत्ती भागातील असल्याने आजबाजूच्या जिल्ह्यांतील लोकांची सतत ये-जा असते. त्यामुळे काेरोना विषाणूत बदल झाला आहे काय हे तपासण्यात येणार आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिव्यांग शाळेत एकाच वेळी ४६ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. हे विद्यार्थी महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना लागण कोठून झाली याचा तपास करण्यासाठी ही चाचणी उपयोगी ठरणार आहे.

सध्या हे रुग्ण बरे झाले असून, दोन दिवसांनी त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले. नव्या स्ट्रेनचा तपास करण्यासाठी गरज भासल्यास पुन्हा एकदा असे नमुने तपासणीसाठी पाठवावे लागणार आहेत.

ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहेत. गुरुवारी ९३ जण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्यातील बागेवाडी तर मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडीतील ज्येष्ठांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आजार लपविल्याने मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळेत निदान व उपचारावर भर देण्यात आला आहे.(लोकमत)

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

मंगळवेढा १३, पंढरपूर  ५७,
सांगोला ३४, द.सोलापूर २७, अक्कलकोट १९, बार्शी ६६, करमाळा ७५, माढा ७०, माळशिरस १२४, मोहोळ ३२, उ. सोलापूर ११

महत्त्वाचे वाचा : 

: धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात माजी सैनिकाची गळफास घेवून आत्महत्या

: अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हलला सुरुवात! फक्त 11 रुपयांत खरेदीकरा मोबाईल,LED टीव्ही व वाशिंग मशीन फक्त 1100 चा हप्ता,सोबत आकर्षक गिफ्ट!

: मंगळवेढ्यातील शिवभक्तांची इच्छा होणार पूर्ण! जागा व परवानगी द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा देऊ; अभिजित पाटलांचा पुढाकार 

: फक्त 99 रुपयांत खरेदीकरा AC, फ्रिज आणि कूलर फक्त 999 चा हप्ता आणि 40 टक्के पर्यंत सवलत आणि आकर्षक भेट वस्तू सुद्धा! अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हल सुरुवात!

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनानवासोलापूर

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
Next Post
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसायासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत

पिकविमा कंपन्याकडून मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक! 'या' साली भरलेल्या विम्यापासून वंचित

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा