mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू, कडक निर्बंधही लागू; सरकारकडून नवी नियमावली जारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 9, 2022
in राज्य
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या.

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे.

त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. हे नवे नियम आज रविवार (9 जानेवारी) मध्यरात्री बारा वाजेपासून लागू होतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके काय-काय?

आजपासून राज्यात कडक निर्बंध रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी. नाईट कर्फ्यू घोषित.

राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय. दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार.

नाट्यगृह, सिनेमागृहांना आसन क्षमतेनुसार फक्त 50 टक्के ग्राहकांसाठी परवानगी राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद.

दिवसा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 72 तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक राहील.

(कोरोना वाढतोय, पण मंत्रीच ऐकेनात, गुलाबराव पाटील पुढे, प्रचंड गर्दी मागे) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसारच नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील.

देशांतर्गत प्रवासासाठी दोन्ही लसींचे डोस लागतील. आंतरराज्यीय प्रवासासाठी प्रवासाच्या 72 तासांआधी आरटीपीआर टेस्ट झालेली असावी. त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह असावा.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर हा फक्त दोन्ही डोस झालेल्यांसाठी करता येईल. स्पर्धा परीक्षा या भारत सरकारच्या नियमावलीनुसार घेतल्या जातील.

सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थिती असेल. पण कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले असावेत.

एकही डोस बाकी असल्यास त्यांना कार्यालयात उपस्थित राहता येणार नाही. (पुणेकरांना काहीसा दिलासा, नव्या बाधितांचा आकडा अंशत: कमी) नव्या नियमावलीनुसार राज्यात काय सुरु-काय बंद?

1) राज्यातील शाळा, कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या कोचिंग क्लासेससाठी सूट देण्यात आली आहे. इतर सर्व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील.

हे क्लासेस ऑनलाईन सुरु असतील. 2) सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे. 3) राज्यात दिवसा जमावबंदी असेल तर रात्री संचारबंदी असेल. पण अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली आहे.

4) मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5) सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 6) राज्यातील थिएटर फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील 7) हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. 8) स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णत: बंद राहतील.

9) विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल. 10) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

11) अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल 12) मुंबई लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. 12) दोन डोस घेतलेल्या ग्राहक आणि पर्यटकांनाच शॉपिंग मॉलमध्ये परवानगी मिळेल. यासाठी ग्राहकांना थर्मल टेस्टिंगला सामोरं जावं लागेल.(स्त्रोत:News 18 लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
Next Post
सलाम! बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, जवानाचं होतंय कौतुक; पाहा व्हिडीओ

सलाम! बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, जवानाचं होतंय कौतुक; पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा