mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 8, 2026
in क्राईम, सोलापूर
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढा टाईम्स न्युज । सांगोला 

मोबाईलचे व्यसन आणि आलिशान गाडी घेण्याच्या हट्टापायी एका २० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घेरडी (ता. सांगोला) येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

प्रयांश पोपट कोकरे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे घेरडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून कोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​याप्रकरणी मृत तरुणाचे वडील पोपट सुखदेव कोकरे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

​दिवसरात्र मोबाईलचे व्यसन अन् सततचा हट्ट

​मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रयांश हा गेल्या काही काळापासून कमालीचा मोबाईलच्या आहारी गेला होता. तो दिवसरात्र मोबाईल पाहण्यातच व्यस्त असायचा.

मोबाईलच्या या अतिवापरामुळे त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा आला होता आणि तो घरच्यांकडे सतत वेगवेगळ्या गोष्टींसाठी हट्ट धरायचा. त्याच्या या सततच्या हट्टामुळे कोकरे कुटुंबातील सर्व सदस्य प्रचंड वैतागले होते.

​आलिशान गाडीसाठी १५ दिवसांपासून वाद

​गेल्या १५ दिवसांपासून प्रयांशने घरच्यांकडे ‘आलिशान गाडी’ घेऊन देण्यासाठी तगादा लावला होता. मला महागडी गाडी पाहिजेच, या हट्टाला तो पेटला होता. यावरून सोमवार रात्री उशिरापर्यंत त्याने आई-वडिलांसोबत जोरदार वाद घातला होता.

मंगळवारी सकाळी पुन्हा याच कारणावरून घरात वाद झाला. वडिलांनी त्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, परिस्थिती समजावून सांगितली; परंतु प्रयांश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

​…अन् रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल

​वडिलांनी समजावून सांगूनही रागाच्या भरात असलेल्या प्रयांशने मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरातील किचनमध्ये जाऊन गळफास घेतला.

हा प्रकार लक्षात येताच वडील पोपट कोकरे यांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

​पालकांनो सावधान! ‘स्क्रीन टाईम’ ठरतोय जीवघेणा

​आजकालच्या तरुणाईमध्ये मोबाईलचे वाढते व्यसन आणि आभासी जगाच्या प्रभावामुळे हट्टीपणा वाढत चालल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
Next Post
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात पोलिसांचे 'मॉकड्रिल'

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..