mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात वेळेपेक्षा जास्त वेळ दुध डेअरी चालू ठेवल्याप्रकरणी दुध डेअरी चालकांवर गुन्हे दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 23, 2021
in क्राईम, मंगळवेढा
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोना कालावधीत कडक लॉकडाऊन असतानाही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विहित वेळेपेक्षा जास्त वेळ दुध डेअरी चालू ठेवल्याप्रकरणी तीन दुध डेअरी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी ,समाधान दत्तात्रय माळी (वय २८, माळी गल्ली, मंगळवेढा), महेश गौरीहर भिमदे (रा.किल्ला भाग मंगळवेढा), संजय मऱ्याप्पा शिकतोडे (वय ४० , रा.भिमनगर ), अशोक बुरूंगे ( हिवरगांव ता. मंगळवेढा) , अभिजीत युवराज पवार (वय २२, धर्मगाव रोड ) , सुधीर बापूराव जाधव ( कारखाना रोड , मंगळवेढा ) यांनी,

जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द भा.दं.वि.सं.कलम १८८,२६ ९ , २७० , साथीचे रोग प्रतिबंध अधि. १८५७ चे कलम २,३,४ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याची फिर्याद पो.ना.राजकुमार ढोबळे यांनी दिली असून याचा अधिक तपास पो.हे.कॉ. पवार  पो.ना.कोळी हे करीत आहेत.

हाताला चावा घेतल्याने महिला जखमी

जमिनीचा वाद मिटवून यापुढे भांडण न करण्याबाबत समजून सांगण्यासाठी गेलेल्या तिघांना भावकीतील महिलेने शिवीगाळ करीत कु – हाड घेऊन मारण्याकरिता दिराच्या अंगावर धावून आली.

मात्र कु – हाड हिसकावून घेतल्याने तिने उजव्या हाताच्या कोपऱ्याला चावा घेऊन चुलत जावेला जखमी केले . ही घटना शुक्रवार २१ रोजी सायं . ६ च्या सुमारास जवळा पांढरेवस्ती ता . सांगोला येथे घडली तालुक्यातील जवळा , पांढरे वस्ती येथील नितीन साळुखे व चुलते आप्पासो साळुखे यांच्यामध्ये १ ९९ ७ पासून जमिनीचा वाद असल्याने कोर्टात केस चालू आहे.

त्यामुळे चुलत सासरे व त्यांच्या घरातील इतर लोक त्यांना जमीन वहिवाटीस नेहमी हरकत अडथळा करीत होते.

याबाबत पोलिसात एकमेकाविरूध्द परस्पर तक्रारी दाखल आहेत. दरम्यान २१ मे रोजी सायं . ६ च्या सुमारास सुवर्णा साळुखे , नितीन साळुखे व विनायक साळुखे असे मिळून आप्पासो साळुखे यांच्या घरी जमिनीचा वाद मिटवून भांडण तंटा न करण्याबाबत समजून सांगण्यासाठी गेले होते.

परंतु त्यांनी या चर्चेला प्रतिसाद दिला नाही . त्यामुळे सर्वजण परत घराकडे निघाले असता चुलत जाऊ लता संजय साळुखे तिच्या घरासमोर उभी राहून सर्वांना शिवीगाळ करू लागली.

त्यावेळी विनायक साळुखे यांनी चुलत भाऊ संजय साळुखे यास पत्नी लता हीस शिवीगाळ करू नको म्हणून सांग असे समजावत होते . त्यावेळी लता ही हातात कु – हाड घेऊन विनायक साळुखे यास मारण्याकरिता अंगावर धावून आली असता सुवर्णाने तिला वेळीच रोखले.

त्यावेळी नितीन साळुखे याने तिच्या हातातील कु – हाड काढून घेतली . परंतु लता हिने सुवर्णाच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला तोंडाने चावा घेऊन जखमी केले. याबाबत , सुवर्णा नितीन साळुखे रा.जवळा , पांढरेवस्ती यांनी लता संजय साळुखे हिच्याविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
Next Post
अबब!! मंगळवेढ्यात जन्माला आले चक्क चार पायाचे कोंबडीचे पिल्लू, बघ्यांची होतेय गर्दी; पहा कुठे घडला हा प्रकार

अबब!! मंगळवेढ्यात जन्माला आले चक्क चार पायाचे कोंबडीचे पिल्लू, बघ्यांची होतेय गर्दी; पहा कुठे घडला हा प्रकार

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा